Thursday, June 13, 2024

बँक ऑफ बडोदाने केली #SaluteHerShakti स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा


बँकेच्या ब्रँड एंडोर्सर्स पी व्ही सिंधू आणि शेफाली वर्मा यांनी केला 
3 विजेत्यांचा सन्मान

 

मुंबई, 13 जून, 2024 (AMN):  सार्वजनिक क्षेत्रामधल्या आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने (बँक) #SaluteHerShakti स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा केली. स्पर्धेचा शुभारंभ दर वर्षी मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनाला होतो. ही स्पर्धा आपल्यातल्या सर्वसामान्य दिसणाऱ्या, तरीदेखील स्वत:च्या क्षेत्रात सर्व अडथळे पार करत, समाजाच्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाणाऱ्या स्त्रियांना ओळखून त्यांचा सन्मान करते. या स्त्रियांच्या गाथा चिकाटी, धैर्य आणि उत्तुंग उत्साहाने भरलेल्या असतात, त्यांच्यापासून सर्वांना प्रेरणा मिळते. दिनांक 08.03.2024 ते 20.03.2024 या स्पर्धेच्या कालावधीमध्ये बॅंकेला तिच्या सोशल मीडिया हँडल्सवर अनेक एंट्रीज आल्या, ज्यांच्यामधून सर्विलिंक सिस्टिम्स लि., वडोदराच्या मधु मोतियानी, नवी मुंबईतील सनशाइन एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापिका सुश्री परमिता मुझुमदार आणि पुणे येथील हेलिआ ग्लोबल स्कुलच्या एज्युप्रेन्योर अनुष सलामपुरिया या तिघी विजेत्या ठरल्या.

 

या तीन विजेत्यांना भारताच्या क्रीडा जगतातील मान्यवर खेळाडू आणि बँकेच्या एंडोर्सर्स पी व्ही सिंधू आणि शेफाली वर्मा यांच्यासोबत संवाद साधण्याची विशेष संधी मिळाली.   

 

चौथ्या वर्षी बँक ऑफ बडोदाची #SaluteHerShakti स्पर्धा पुरुष आणि स्त्रियांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देते. स्पर्धेतल्या प्रवेशासाठी स्पर्धकांना त्यांच्या जीवनात, प्रयत्नांमध्ये तसेच यशामध्ये त्यांच्यासाठी प्रेरणा स्त्रोत ठरलेल्या  आणि त्यांच्या जीवनावर प्रभावी ठसा उमटवणाऱ्या सर्वसामान्य स्त्रीचा किस्सा सादर करावा लागतो.  

 

बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्री लाल सिंग म्हणाले, “बँक ऑफ बडोदाची #SaluteHerShakti स्पर्धा सर्वसामान्य भासणाऱ्या स्त्रियांच्या असामान्य गाथा शेअर करण्याचा आणि त्यामधून बरेच काही शिकण्याचा एक मंच आहे. स्पर्धेमध्ये स्त्री सबळीकरणाचा सन्मान करुन आणि रुढींना झुगारुन स्त्रियांच्या यशाची पोचपावती दिली जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो. या सर्व स्त्रिया कौतुकास्पद आहेत. त्यांच्यामुळे अनेकांना आपले स्वप्न, अपेक्षा आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलायला प्रेरणा मिळणार आहे.”

Friday, June 7, 2024

आयपीआरएस x स्वरथमा टूर पुण्यात



पुणे, ७ जून २०२४ (आदर्श महाराष्ट्र) - आयपीआरएस (इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटी लिमिटेड), संगीत निर्मात्यांचे हक्क संरक्षित करण्यासाठी आघाडीची संस्था, नुकतीच बंगलोरच्या प्रसिद्ध भारतीय फोक-फ्यूजन बँड स्वरात्मा सोबत बहुप्रतीक्षित टूरसाठी एकत्र आली आहे. ही टूर केवळ अविस्मरणीय संगीत सादर करण्याविषयी नाही तर टिकाऊपणाचा प्रचार करण्याविषयी आहे. पारंपरिक डिझेल जनरेटरच्या ऐवजी पोर्टेबल क्लीन एनर्जी सिस्टीमने त्यांच्या परफॉर्मन्सला शक्ती देण्याचे वचन देऊन, स्वरात्मा पर्यावरणपूरक कॉन्सर्ट्ससाठी एक नवीन मानक स्थापित करत आहे.

ही टूर केवळ सादरीकरणांची मालिका नाही. एका सहकार्याने, इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेड (आयपीआरएस) आणि स्वरात्मा संगीत उद्योगात टिकाऊ पद्धतींचा प्रचार करण्यासाठी भागीदारी करत आहेत. हा पुढाकार आयपीआरएस च्या ‘माय म्युझिक माय राइट्स’ मोहिमेसोबत उत्तम प्रकारे जुळते, ज्याचा उद्देश डिजिटल जगात संगीत निर्मात्यांना सशक्त बनवणे आहे. एकत्रितपणे, आयपीआरएस आणि स्वरात्मा मुख्य संगीत बाजारपेठांमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी आणि निर्मात्यांच्या समुदायाशी सखोलपणे संवाद साधण्यासाठी सज्ज आहेत.

हा कार्यक्रम- शनिवार दिनांक 8 जून 2024 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता, फिनिक्स मार्केटसिटी, विमान नगर, पुणे येथे होणार आहे.

निर्मात्यांसाठी, ही टूर एक अद्वितीय संधी देते. IPRS प्रत्येक शहरात कॉन्सर्ट्सपूर्वी ज्ञान कार्यशाळा आयोजित करणार आहे, ज्यात संगीत हक्क, रॉयल्टीज, आणि टिकाऊ करिअर विकास याविषयी अमूल्य माहिती दिली जाईल. या संवादात्मक सत्रांमुळे निर्मात्यांना IPRS आणि स्वरात्मा टीमशी संवाद साधण्याचे, त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे आणि संगीत क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळवण्याचे व्यासपीठ उपलब्ध होईल. स्वरात्मा, एक स्थापन झालेला बँड आणि IPRS सदस्य, यांच्या उपस्थितीमुळे या कार्यशाळा निश्चितच मोठी मूल्यवर्धन करतील, ज्यामुळे या कार्यशाळा एक आवर्जून उपस्थित राहण्यायोग्य घटना बनतील.

जिथे शिक्षण मनोरंजनाला भेटते त्या प्रेरणादायी प्रवासाचा भाग व्हा. उद्योगातील तज्ञांकडून शिकण्याची आणि संगीताच्या भविष्यात क्रांतिकारक बदल करणाऱ्या पुढाकाराचा भाग बनण्याची संधी गमावू नका. टूरच्या तारखा आणि कार्यशाळा नोंदणीसाठी अधिक माहितीसाठी [वेबसाइट लिंक] भेट द्या. चला एकत्र निर्माण करूया, शिकूया, आणि टिकाऊ बनवूया!

Wednesday, June 5, 2024

सिल्वर शो 7 से 10 जून को मुंबई के जियो कन्वेंशन सेंटर में आयोजित होगा विशिष्ट द्वितीय "सिल्वर शो ऑफ इंडिया" में 350 टन चांदी और 150,000 से अधिक डिजाइन प्रदर्शित होगी




मुंबई, 5 जून, 2024 आदर्श महाराष्ट्र समाचार (AMN): "सिल्वर शो ऑफ इंडिया" नामक चांदी की विशिष्ट द्वितीय प्रदर्शनी 7 से 10 जून 2024 को मुंबई बीकेसी स्थित जिओ कन्वेंशन सेंटर में आयोजित होगी. 

इंडिया बुलियन एंड ज्वेलर्स एसोसिएशन लि. (इब्जा) के राष्ट्रीय प्रमुख पृथ्वीराज कोठारी ने बताया कि विश्व भर के विख्यात सिल्वर ज्वैलर और डिजाइनर के यहां 800 से अधिक बूथ होंगे. इब्जा के नेशनल वाइस प्रेसिडेंट डॉक्टर चेतन मेहता ने कहा कि यहां नैनाकर्षक सिल्वर आर्टिफैक्ट का विशिष्ट कलेक्शन प्रदर्शित होगा. 

इसमें ऑर्नेटनेट ज्वेलरी, जटिल डिजाइन का होम डेकोर, सुंदर ढंग से जड़ित कटलरी आदि दिखाई देगे. यहां 25,000 रजिस्टर्ड मुलाकातियों के प्रदर्शनी की मुलाकात लेने की धारणा है. इब्जा के नेशनल सेक्रेट्री सुरेंद्र मेहता ने कहा कि यहां समृद्ध सांस्कृतिक विरासत दिखाई देगी. 

इस प्रदर्शनी में 350 टन चांदी प्रदर्शित होगी. यहां कलाकार, कलेक्टर, विवेचन और उत्साही लोग एक ही प्लेटफार्म पर मिल सकेंगे. यहां उद्योग के विशेषज्ञों द्वारा वर्कशॉप और डेमोंस्ट्रेशन आयोजित होगा. वे चांदी की टेक्निक और कीमती धातुओं के इतिहास की जानकारी देंगे.

Thursday, May 30, 2024

रुणवाल’च्या वतीने सर्वाधिक प्रतिष्ठीत टॉवर – ब्रीझ या लॅंडमार्क प्रोजेक्टचे रुणवाल लँड्स एंड, कोलशेत, ठाणे येथे अनावरण



मुंबई, 30 मे, 2024 (AMN): रुणवाल हा मुंबईतील प्रमुख स्थावर मालमत्ता विकासकांपैकी एक असून त्यांच्या प्रमुख प्रकल्पाचा भाग असलेल्या ब्रीझ या ठाणे शहरातील कोलशेत भागात असलेल्या सर्वोत्तम गेटेड कम्युनिटी असलेल्या रुणवाल लँड्स एंड या उत्कृष्ट टॉवरचे अनावरण केले आहे. टॉवर, ब्रीझ, 1-2 बीएचके कॉन्फिगरेशनमध्ये 500 + युनिट उपलब्ध करून देते. खरेदीदारांसाठी रु. 62 लाख- रु. 1.10 कोटीमध्ये उपलब्ध आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून टॉवरला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे.

जागा आणि गोपनीयता मिळवून देण्याच्या दृष्टीने डिझाइन केलेल्या टॉवरसह, संपूर्ण विकास 70% पेक्षा जास्त खुल्या क्षेत्रावर विस्तारलेला आहे. या नवीन टॉवरमध्ये अनुरूप घरे आहेत, डोळ्यासमोर विशाल हिरवीगार लक्षवेधी विहंगम दृश्य आणि उल्हास नदीचे आल्हाददायक पात्र जागेच्या सौंदर्यात भर घालते. हे नेत्रदीपक दृश्य शांतता आणि समाधान भावना प्रतिबिंबित करते.


या भूभागाचे नैसर्गिक सौंदर्य जमीन, पाणी आणि आकाश यांचा सुसंवाद निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाशी जुळवून घेण्यासाठी विकासाची रचना करण्यात आली आहे. नवीन युगाच्या बदलत्या खरेदीदारांच्या गरजेनुसार बांधली जाणारी नवीन आणि प्रगत शहरी निवासस्थाने तयार करण्याच्या रुणवालच्या दृष्टिकोनाशीही हे सुसंगत आहे.


अगदी शांततापूर्ण आणि आरामदायी जीवन जगण्याची इच्छा असणाऱ्यांकरिता रुणवाल लँड्स एंडची रचना करण्यात आली आहे. या बांधकामात सात टॉवर आहेत, जे 10 एकर क्षेत्रात पसरलेले आहेत आणि 1,600 एकरच्या हिरव्यागार दृश्यांमध्ये वसलेले आहेत. यात या प्रदेशातील सर्वात मोठा बहुस्तरीय क्लबहाऊस इथे असेल. त्याचप्रमाणे 6 एकरांवर पसरलेल्या 70 हून अधिक रिसॉर्ट-शैलीच्या सुविधांची प्रभावी मांडणी आहे. इथल्या प्रत्येक घरातून उल्हास नदीचे नयनरम्य दृश्य डोळे सुखावेल. विशेष सुविधांमध्ये सुमारे 1 लाख चौरस मीटर क्षेत्रासह एक गोल्फ क्षेत्र, एक सनराईज गझीबो, एक स्विमिंग पूल, बहुउद्देशीय क्रीडा जागा (कोर्टस्), एक डान्स अरेना आणि वाळूच्या किनाऱ्याचा समावेश आहे. वाहन-मुक्त पोडियम एरिया, आलिशान आणि विश्रांतीची जीवनशैलीची खातरजमा करते.


नवीन टॉवरच्या लॉन्चविषयी बोलताना रुणवाल’चे मॅनेजिंग डायरेक्टर संदीप रुणवाल म्हणाले, "रुणवालचा नवीन टॉवर - टॉवर ब्रीझ रुणवाल लँड्स एंड येथे सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. नवीन टॉवर लॉन्च आमच्या खरेदीदारांच्या अपवादात्मक जीवन अनुभवांची पूर्तता करण्यासाठी आहे. आलिशान, आरामदायी आणि नाविन्यपूर्ण गोष्टींचे मिश्रण असलेल्या विलक्षण निवासस्थानांची निर्मिती करण्याच्या आमच्या बांधिलकीचे हा नवीन टॉवर उदाहरण आहे. समकालीन रचना, उच्च दर्जाच्या सुविधा आणि सोयीस्कर स्थानासह, रुणवाल लँड्स एंडने उच्चभ्रू जीवनासाठी एक नवीन मापदंड स्थापित केला आहे.


व्यापक पायाभूत सुविधा विकास आणि मल्टी-मॉडेल कनेक्टिव्हिटीसह, ठाणे येथील कोलशेत भाग विकासकासाठी एक फायदेशीर ठिकाण म्हणून उदयास आले आहे. या भागात असलेली शांतता आणि हवेची गुणवत्ता (एक्यूआय) ही वैशिष्ट्ये पर्यावरणपूरक राहणीमानाचा अनुभव वाढवतात. याव्यतिरिक्त, शैक्षणिक संस्था आणि आसपासच्या भागातील विविध खरेदी तसेच डायनिंग एक्सपिरियन्स विश्रांतीच्या पर्यायांसह सामाजिक-आर्थिक विकास, या प्रदेशातील एकूण मागणीमध्ये आणखी एक प्रमुख योगदान देत आहे.


प्रस्तावित कोलशेत- दक्षिण मुंबई- वसई जलमार्ग, मुंबई मेट्रो मार्ग 4 आणि 5, बोरिवली-ठाणे बोगदा आणि ठाणे रोड अशा सुविधांमुळे दळणवळण सुधारेल. भिवंडी नाका ते लिंक रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत भूमिगत रेल्वे यासारख्या प्रस्तावित प्रकल्पांमुळे सुलभतेत भर पडेल. ही प्रगती कोलशेत भागाची सामाजिक-आर्थिक वाढ, त्याचप्रमाणे एक भरभराटीचे शहरी केंद्र अशी उत्क्रांती दर्शवते.



आमदार महेंद्र थोरवेंकडून जीवाला धोका - भाजप कार्यकर्ते ॲड. ऋषिकेष जोशी यांचा गंभीर आरोप; कर्जतमध्ये गुन्हे वाढले

ॲड. ऋषिकेष जोशी

कर्जत, 30 मे २०२४, प्रतिनिधी (AMN): कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून माझ्या जीवाला धोका असून याबाबत मी पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, रायगड जिल्हा पोलिस प्रशासन थोरवे यांच्या दहशतीखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे कार्यकर्ते ॲड. ऋषिकेश जोशी यांनी केला आहे.  

ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी जोशी यांनी कर्जतमध्ये पत्रकार परिषद घेऊन आमदार थोरवे यांच्या दहशतीबद्दल आणि त्यांच्या वरदहस्ताखाली सुरु असलेल्या अनधिकृत कामांबद्दल आरोप केले. जोशी म्हणाले, कर्जत शहरात भाई हुतात्मा कोतवाल व्यायाम शाळेच्या समोर असलेल्या खुल्या मैदानात व्यायामशाळा बांधण्याच्या नावावर व्यावसायिक दुकान गाळे बांधले आहेत. याची चौकशी करावी याबाबत कर्जत पोलिसांत तक्रार केली. तसेच माझ्या जीवाला त्यांच्याकडून धोका संभवतो, असा आरोप जोशी यांनी केली आहे.

ॲड. जोशी म्हणाले, याबाबत मी चार महिन्यांपूर्वी पत्र दिले आहे. एकमहिन्यापूर्वी तक्रार देखील दिली. मात्र माझा जबाब घेतला जात नाही. त्यामुळे माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला आमदार थोरवे जबाबदार असतील, अशी तक्रार केली आहे. मात्र रायगड जिल्हा पोलिस प्रशासन आमदारांच्या दहशतीखाली काम करत आहे, असा आरोप अँड. जोशी यांनी पत्रकारपरिषदेत केला. 

यावेळी ॲड. जोशी म्हणाले, कर्जतमध्ये काही दिवसांपूर्वी एका महिलेवर हल्ला झाला. तो गुन्हा एलसीबीकडे न देता त्याचा तपास कर्जत पोलिसांनीच केला. तसेच पळसदरी तलावात एक प्रेत सापडले आहे. याची कोणाला कल्पना नाही. तसेच पूर्वी भाजपच्या कार्यकर्ते असलेल्या आणि सध्या शिंदे गटात काम करणाऱ्या आरती माळवे यांचा पळसदरी रस्त्यावर अपघात होऊन मृत्यू झाला. याबाबत संशय व्यक्त करत स्थानिक आमदारांनी याबाबत आवाज का उठवला नाही असा सवाल केला, याबाबत सीबीआयतर्फे चौकशी करावी व या घटनेची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली. 

कर्जत विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. कर्जत, खोपोली, नेरळ, माथेरान पोलीस स्टेशनमध्ये त्रस्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या स्टेशन डायऱ्या तपासा त्यांनी डायऱ्यांमध्ये थेट राजकीय दबाव आल्याचे नमुद केले आहे. यापूर्वी असे कधी झाले नव्हते पोलिसांवर राजकीय दबाव आहे, हे पोलिस नमुद करतात हे फार गंभीर आहे. यामध्ये कोणतीही कारवाई जिल्हा पोलिस प्रमुखांकडून होत नाही. असे देखील अँड. जोशी म्हणाले.

चौकट :

पांडूरंगाची मुर्ती स्मशानभूमीच्या जागेत ! 

नगर परिषद हद्दीत प्रति आळंदी व पंढरपूर उभारण्यात आले आहे. येथे श्रीराम पुलानजीक पांडुरंगाची ५१ फूट मूर्ती बसवण्यात आली आहे. त्या मूर्तीचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात होते. मात्र, ज्या जागेवर ही मूर्ती बसविली आहे. ती जमिन स्मशानभूमीची आहे, असा गौप्यस्फोट ॲड. ऋषिकेश जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्र्यांची फसवणूक करुन या मुर्तीचे उद्घाटन केले. याप्रकरणी चौकशी करुन कारवाई करण्यात यावी असे जोशी म्हणाले. या प्रकरणी जिल्हाधिकारी, नगरविकास खाते, आणि जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती जोशी यांनी दिली.

Monday, May 27, 2024

सुधाकर घारेंनी विधानसभेचे रणशिंग फुंकले





मुंबई, मे २७, २०२४ (AMN): काल रविवार दिनांक २६ मे रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात कर्जत तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा पार पडली. नुकत्याच पार पडलेल्या मावळ लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे मत जाणून घेण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वांनी आपल्याला मतदानादिवशी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून विश्वासात न घेतल्याची आणि दुय्यम वागणुक दिल्याची खंत बोलुन दाखवली.

यावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकुण घेत झालेले सर्व विसरुन जाऊयात आणि नव्या दमाने आता विधानसभेच्या कामाला लागुयात या शब्दात आपल्या कार्यकर्त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पक्षाचे नेते सुधाकर घारे यांनीसुद्धा या गोष्टीची दखल घेत आपले स्पष्टीकरण दिले तसेच याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे काम केल्याचा मला अभिमान वाटत असल्याचे सांगीतले. तसेच आपल्या भाषणात अनेक गोष्टींवर प्रकाश टाकत त्यांनी आता विधानसभेच्या तयारीला लागण्याचा संदेश सर्वांना दिला.

या विधानसभेला महायुतीकडून राष्ट्रवादीचा उमेदवार असेल हे सांगायलाही ते विसरेल नाही. एकंदरीत लोकसभेच्या निकालापुर्वीच सुधाकर भाऊ घारे विधानसभेच्या तयारीला लागल्याचे चित्र कर्जत खालापूर मतदारसंघात दिसत आहे. दरम्यान यानिमीत्ताने काही पक्षप्रवेश आणि पदनियुक्तया देखील करण्यात आल्या. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

माझ्या कार्यकर्त्यांचा मला गर्व - सुधाकर घारे

रविवारी पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना माननीय सुधाकर भाऊ घारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे तोंडभरुन कौतुक केले. त्याच झाल अस की मावळ लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीवेळी अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी भाऊंना फोनद्वारे त्यांना शिंदे गटाचे कार्यकर्ते सामावून घेत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याचा उल्लेख करत आपल्याला निवडणूकीदरम्यान काही गालबोट लागु द्यायचे नव्हते त्यामुळे मी याच्यावर आजवर बोललो नसल्याचे सुधाकर भाऊ घारे यांनी सांगीतले. अशाही परिस्थितीत माझ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याने त्याचे काम प्रामाणिकपणे केले याचा मला गर्व आहे.

यावेळी बोलताना त्यांनी याअगोदर महाविकास आघाडीत असताना शेकापच्या उमेदवाराला निवडूण आणण्यात राष्ट्रवादीने आपली पुर्ण ताकद लावली होती आणि तो उमेदवार निवडूण देखील आणला होता. त्यामुळे आम्ही जिथे असतो तिथे प्रामाणिकपणे काम करतो. कुणी म्हणत असेल राष्ट्रवादीने काम केल नाही तर त्याला उत्तर द्यायला मी समर्थ आहे असे सुधाकर भाऊ म्हणाले. ४ जुनला असेही प्रत्येकाचा बुथ आणि ग्रामपंचायतला किती मतदान झाले हे समजेल हे सांगायला ते विसरले नाहीत.


आमचा पैलवान सांगेलत्याच्याशी कुस्ती खेळायला तयार : २०१७ च्या जिल्हापरिषदेलाच तुम्हाला चितपट केले

दरम्यान लोकसभा निवडणुकीपुर्वी शिंदे गटाच्या एका नेत्याने कुस्ती करायला मैदानात या अशा पद्धतीचे वक्तव्य केले होते. रविवारी सर्वसाधारण सभेत बोलताना त्या वक्तव्याची आठवण करुन देत आपण त्या संबंधित व्यक्तीला २०१७ च्या जिल्हापरिषदेच्या निवडणुतीतच चितपट केल्याचे सांगीतले. याचसोबत आताही आमचा पैलवान सांगताल त्याच्याशी कुस्ती खेळायला तयार आहे असे म्हटले. एकंदरीत आता लोकसभेची निवडणून संपल्यानंतर पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर असणारा राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे गटाचा वाद पुन्हा एकदा पेटणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

मतदारसंघातील शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहचवले जाईल - सुधाकर भाऊ घारे

दरम्यान मागील काही दिवसापासुन तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि त्याचवेळी पाणीटंचाई या अडचणींचा सामना सामान्य नागरीकांना करावा लागत आहे. याची दखल घेत सुधाकर भाऊ घारे नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत वेळ पडल्यास प्रशासनाची सुद्धा मदत घेत आहेत. त्याचवेळी रविवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी गरज असेल त्या सर्व भागात टॅंकरने पाणी पोहचवा अशा सुचना सर्वांना दिल्या. पहिला पाऊस पडेपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहचवा असे प्रतिपादन यावेळी बोलताना त्यांनी केले. गेले अनेक दिवसांपासून कर्जत खालापूर मध्ये अनेक ठिकाणी सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या माध्यमातून टॅंकरने पाणी वाटप करण्यात येत आहे. मतदारसंघातील लोकप्रतिनिधी मात्र आपल्या कार्यालयात बसुन फक्त आढावा घेतल्याच्या बातम्या येत असतानाच सुधाकर घारे थेट लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचे पाहून सामान्य जनतेला खूप मोठा आधार मिळत आहे.




राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाची मालिका पुन्हा सुरु होणार

सुधाकर घारेंच्या नेतृत्वात मागील काही महिण्यांपासुन प्रत्येक रविवारी विविध पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये होणारे पक्षप्रवेश लोकसभा निवडणुदरम्यान महायुतीत काही वाद नको म्हणून थांबवण्यात आले होते. दरम्यान रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात सुधाकर भाऊ घारे यांनी पु्न्हा एकदा प्रत्येक रविवारी होणारे पक्षप्रवेश सुरु होतील असे सुतोवाच केले. विधानसभा निवडणुकीचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन सुधाकर घारे यांनी पक्षविस्तार करण्यासाठी आपली कंबर कसली आहे. आता पुन्हा कोणत्या पक्षातील मोठी नावे सुधाकर घारेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश करतील हे पाहण्यासारखे असेल.

Saturday, May 25, 2024

ओजस आय हॉस्पिटलने पश्चिम भारतात पहिल्‍यांदाच क्रांतिकारी व्हिजन करेक्‍शन प्रक्रिया ‘एलिटा सिल्‍क' लाँच केले


जागतिक स्‍तरावर मायोपियाच्‍या वाढत्‍या प्रमाणाचे निराकरण करण्‍यासाठी ओजस आय हॉस्पिटलने व्हिजन करेक्‍शन प्रक्रिया ‘एलिटा सिल्‍क' लाँच केले 

  • रूग्‍ण १२ ते २४ तासांच्‍या आत बरे होतात. उपचारासाठी लागणारा कालावधी इतिहासामध्‍ये सर्वात गतीशील
  • ओजस आय हॉस्पिटलची विस्‍तारीकरणाची योजना                                

मुंबई, २५ मे २०२४ (आदर्श महाराष्ट्र): आय केअरमधील सर्वात अचंबित करणारा ट्रेण्‍ड म्‍हणजे मायोपियाचे (दूर दृष्‍टीदोष) वाढते प्रमाण. आज, जगभरातील जवळपास ३० टक्‍के व्‍यक्‍ती मायोपियाने पीडित आहेत आणि २०५० पर्यंत जगभरातील ५० टक्‍के व्‍यक्‍ती या आजाराने पीडित असण्‍याचा अंदाज आहे ज्‍यामुळे हा आजार ५ बिलियन व्‍यक्‍तींना प्रभावित करणारी जागतिक समस्या आहे. मायोपियाच्‍या उपचारामध्‍ये चष्‍मे, कॉन्‍टॅक्‍ट लेन्‍सेस किंवा रूग्‍णाचा रिफ्रॅक्टिव्‍ह एरर म्‍हणजेच अपवर्तक दोष आणि दूर दृष्‍टीदोष सुधारण्‍यासाठी रिफ्रॅक्टिव्‍ह सर्जरी यांचा समावेश असतो. 

प्रगत आय केअरमधील अग्रणी ओजस आय हॉस्पिटलने मुंबईतील बांद्रा (पश्चिम) येथील आपल्‍या प्रमुख केंद्रामध्‍ये नवीन लेझर व्हिजन करेक्‍शन तंत्रज्ञान ‘एलिटा सिल्‍क'च्‍या लाँचची घोषणा केली आहे. या उल्‍लेखनीय तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे हे पश्चिम भारतातील पहिले आय हॉस्पिटल (नेत्र रूग्‍णालय) आहे.   

ओजस आय हॉस्पिटलमध्‍ये चष्‍म्‍याच्‍या नंबरमध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी एलिटा सिल्‍क लेझर आय सर्जरी लेझर व्हिजन करेक्‍शनमधील मोठी झेप आहे, जे आता मुंबईतील ओजस आय हॉस्पिटलमध्‍ये उपलब्‍ध आहे. ही सर्जरी डोळ्यांचे चष्‍मे व कॉन्‍टॅक्‍ट लेन्‍सेस दूर करण्‍यासाठी जलद, सुरक्षित व ब्‍लेड-लेस सोल्‍यूशन देते. 

पश्चिम भारतात पहिल्‍यांदाच एलिटा सिल्‍कच्‍या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत ओजस आय हॉस्पिटलचे प्रमुख वैद्यकीय संचालक  डॉ. नितीन देढिया म्‍हणाले, “ओजस आय हॉस्पिटलमध्‍ये आम्‍ही सतत आय केअरमधील अत्‍याधुनिक तंत्रज्ञानांचा अवलंब करतो. २०१२ मध्‍ये पहिले ब्‍लेड-लेस लासिक उपचार सादर करण्‍यापासून २०१८ मध्‍ये कॉन्‍टोरा फेम्‍टोसेकंड लेझरमध्‍ये अग्रणी असण्‍यापर्यंत आम्‍हाला बांद्रामधील आमच्‍या प्रमुख केंद्रामध्‍ये एलिटा लेझर लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. दर्जात्‍मक आय केअर देण्‍याप्रती कटिबद्ध एलिटा सिल्‍क लेझर आय सर्जरी २४ तासांमध्‍ये रिकव्‍हरीसह चष्‍मे दूर होण्‍याची, तसेच दृष्‍टीमध्‍ये उत्तम सुधारणा होण्‍याची खात्री देते.'' 

३८ वर्षांपासून लासिक प्रक्रियांमधील जागतिक तज्ञ डॉ. नितीन देढिया यांनी या तंत्रज्ञानाच्‍या व्‍यावसायिक लाँचपूर्वी २०२३ मध्‍ये यूएसएमध्‍ये एलिटा सिल्‍क मशिनचा प्रत्‍यक्ष अनुभव घेतला. डिसेंबर २०२३ मध्‍ये व्‍यावसायिक लाँचपासून ओजस आय हॉस्पिटलमध्‍ये टीमने अेनक सिल्‍क प्रक्रिया यशस्‍वीरित्‍या पूर्ण केल्‍या आहेत आणि रूग्‍णांसाठी सर्वोत्तम निष्‍पत्ती संपादित केल्‍या आहेत, जेथे अनेक रूग्‍णांनी ६/५ व्हिजन प्राप्‍त केले आहे, जे ‘सुपर व्हिजन' म्‍हणून ओळखले जाते.   

जगभरात मायोपियाने पीडित व्‍यक्‍तींच्‍या संख्‍या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रगत व अत्‍यंत अचूक तंत्रज्ञानांच्‍या माध्‍यमातून मायोपियाचे निराकरण करण्‍याची गरज ओळखत ओजस आय हॉस्पिटल हे बांद्रा (पश्चिम) मधील त्‍यांच्‍या केंद्रामध्‍ये कॉन्‍टोरा व्हिजन टेक्‍नॉलॉजीसह हे प्रगत तंत्रज्ञान देणारे पश्चिम भारतातील (महाराष्‍ट्र, गुजराम, मध्‍यप्रदेश व गोवा) एकमेव आय हॉस्पिटल आहे. 

भारतात सिल्‍क आय सर्जरीचा सरासरी खर्च दोन्‍ही डोळ्यांसाठी १२५,००० रूपये ते १५०,००० रूपयांपर्यंत आहे. हा खर्च व्‍यक्‍तींच्‍या गरजांनुसार बदलू शकतो हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. 

सध्‍या, ओजस आय हॉस्पिटल बांद्रा व कांदिवली येथे स्थित आहे, तसेच बांद्रा येथील प्रमुख केंद्र ३ मजल्‍यांचे आहे. ओजस आय हॉस्पिटलमध्‍ये डॉ. नितीन यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत वैद्यकीय टीमने गेल्‍या ३८ वर्षांमध्‍ये जगभरातील ५००,००० हून अधिक रूग्‍णांची दृष्‍टी यशस्‍वीपणे सुधारली आहे. तसेच, हॉस्पिटलने १२५,००० हून अधिक रूग्‍णांवर यशस्‍वीरित्‍या ऑपरेशन करण्‍यासह ५०,००० हून अधिक मोतीबिंदू ऑपरेशन आणि ४०,००० हून अधिक प्रगत लासिक ऑपरेशन केले आहेत. हॉस्पिटलची नजीकच्‍या भविष्‍यात मुंबईतील इतर ठिकाणी नवीन अत्‍याधुनिक केंद्रे सुरू करण्‍याची योजना आहे. 

वेबसाइट: www.ojaseyehospital.com 

Kalamanthan 2 Opens with a Grand Celebration of Art and Culture at Bombay Art Society

MUMBAI, INDIA, 29 OCTOBER, 2026 (AMN) : –The grand inauguration of Kalamanthan 2 – The Art Showcase cum Sales, curated by Bouquet of Art Ga...