Thursday, June 13, 2024

बँक ऑफ बडोदाने केली #SaluteHerShakti स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा


बँकेच्या ब्रँड एंडोर्सर्स पी व्ही सिंधू आणि शेफाली वर्मा यांनी केला 
3 विजेत्यांचा सन्मान

 

मुंबई, 13 जून2024 (AMN):  सार्वजनिक क्षेत्रामधल्या आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने (बँक) #SaluteHerShakti स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा केली. स्पर्धेचा शुभारंभ दर वर्षी मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनाला होतो. ही स्पर्धा आपल्यातल्या सर्वसामान्य दिसणाऱ्यातरीदेखील स्वत:च्या क्षेत्रात सर्व अडथळे पार करतसमाजाच्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाणाऱ्या स्त्रियांना ओळखून त्यांचा सन्मान करते. या स्त्रियांच्या गाथा चिकाटीधैर्य आणि उत्तुंग उत्साहाने भरलेल्या असतातत्यांच्यापासून सर्वांना प्रेरणा मिळते. दिनांक 08.03.2024 ते 20.03.2024 या स्पर्धेच्या कालावधीमध्ये बॅंकेला तिच्या सोशल मीडिया हँडल्सवर अनेक एंट्रीज आल्याज्यांच्यामधून सर्विलिंक सिस्टिम्स लि.वडोदराच्या मधु मोतियानीनवी मुंबईतील सनशाइन एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापिका सुश्री परमिता मुझुमदार आणि पुणे येथील हेलिआ ग्लोबल स्कुलच्या एज्युप्रेन्योर अनुष सलामपुरिया या तिघी विजेत्या ठरल्या.

 

या तीन विजेत्यांना भारताच्या क्रीडा जगतातील मान्यवर खेळाडू आणि बँकेच्या एंडोर्सर्स पी व्ही सिंधू आणि शेफाली वर्मा यांच्यासोबत संवाद साधण्याची विशेष संधी मिळाली.   

 

चौथ्या वर्षी बँक ऑफ बडोदाची #SaluteHerShakti स्पर्धा पुरुष आणि स्त्रियांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देते. स्पर्धेतल्या प्रवेशासाठी स्पर्धकांना त्यांच्या जीवनातप्रयत्नांमध्ये तसेच यशामध्ये त्यांच्यासाठी प्रेरणा स्त्रोत ठरलेल्या  आणि त्यांच्या जीवनावर प्रभावी ठसा उमटवणाऱ्या सर्वसामान्य स्त्रीचा किस्सा सादर करावा लागतो.  

 

बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्री लाल सिंग म्हणाले, “बँक ऑफ बडोदाची #SaluteHerShakti स्पर्धा सर्वसामान्य भासणाऱ्या स्त्रियांच्या असामान्य गाथा शेअर करण्याचा आणि त्यामधून बरेच काही शिकण्याचा एक मंच आहे. स्पर्धेमध्ये स्त्री सबळीकरणाचा सन्मान करुन आणि रुढींना झुगारुन स्त्रियांच्या यशाची पोचपावती दिली जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो. या सर्व स्त्रिया कौतुकास्पद आहेत. त्यांच्यामुळे अनेकांना आपले स्वप्नअपेक्षा आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलायला प्रेरणा मिळणार आहे.”

No comments:

Post a Comment

"The Reflection of Mind" Group exhibition of Paintings by 3 reputed artists from Kolkata At Hirji Jehangir Art Gallery, Kala Ghoda, Mumbai

The Reflection of Mind, At Hirji Jehangir Art Gallery, Kala Ghoda, Mumbai, From 21st to 27th April, 2025 MUMBAI, 20 APRIL, 2025 (AMN):  Grou...