Thursday, May 30, 2024

रुणवाल’च्या वतीने सर्वाधिक प्रतिष्ठीत टॉवर – ब्रीझ या लॅंडमार्क प्रोजेक्टचे रुणवाल लँड्स एंड, कोलशेत, ठाणे येथे अनावरण



मुंबई, 30 मे, 2024 (AMN): रुणवाल हा मुंबईतील प्रमुख स्थावर मालमत्ता विकासकांपैकी एक असून त्यांच्या प्रमुख प्रकल्पाचा भाग असलेल्या ब्रीझ या ठाणे शहरातील कोलशेत भागात असलेल्या सर्वोत्तम गेटेड कम्युनिटी असलेल्या रुणवाल लँड्स एंड या उत्कृष्ट टॉवरचे अनावरण केले आहे. टॉवर, ब्रीझ, 1-2 बीएचके कॉन्फिगरेशनमध्ये 500 + युनिट उपलब्ध करून देते. खरेदीदारांसाठी रु. 62 लाख- रु. 1.10 कोटीमध्ये उपलब्ध आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून टॉवरला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे.

जागा आणि गोपनीयता मिळवून देण्याच्या दृष्टीने डिझाइन केलेल्या टॉवरसह, संपूर्ण विकास 70% पेक्षा जास्त खुल्या क्षेत्रावर विस्तारलेला आहे. या नवीन टॉवरमध्ये अनुरूप घरे आहेत, डोळ्यासमोर विशाल हिरवीगार लक्षवेधी विहंगम दृश्य आणि उल्हास नदीचे आल्हाददायक पात्र जागेच्या सौंदर्यात भर घालते. हे नेत्रदीपक दृश्य शांतता आणि समाधान भावना प्रतिबिंबित करते.


या भूभागाचे नैसर्गिक सौंदर्य जमीन, पाणी आणि आकाश यांचा सुसंवाद निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाशी जुळवून घेण्यासाठी विकासाची रचना करण्यात आली आहे. नवीन युगाच्या बदलत्या खरेदीदारांच्या गरजेनुसार बांधली जाणारी नवीन आणि प्रगत शहरी निवासस्थाने तयार करण्याच्या रुणवालच्या दृष्टिकोनाशीही हे सुसंगत आहे.


अगदी शांततापूर्ण आणि आरामदायी जीवन जगण्याची इच्छा असणाऱ्यांकरिता रुणवाल लँड्स एंडची रचना करण्यात आली आहे. या बांधकामात सात टॉवर आहेत, जे 10 एकर क्षेत्रात पसरलेले आहेत आणि 1,600 एकरच्या हिरव्यागार दृश्यांमध्ये वसलेले आहेत. यात या प्रदेशातील सर्वात मोठा बहुस्तरीय क्लबहाऊस इथे असेल. त्याचप्रमाणे 6 एकरांवर पसरलेल्या 70 हून अधिक रिसॉर्ट-शैलीच्या सुविधांची प्रभावी मांडणी आहे. इथल्या प्रत्येक घरातून उल्हास नदीचे नयनरम्य दृश्य डोळे सुखावेल. विशेष सुविधांमध्ये सुमारे 1 लाख चौरस मीटर क्षेत्रासह एक गोल्फ क्षेत्र, एक सनराईज गझीबो, एक स्विमिंग पूल, बहुउद्देशीय क्रीडा जागा (कोर्टस्), एक डान्स अरेना आणि वाळूच्या किनाऱ्याचा समावेश आहे. वाहन-मुक्त पोडियम एरिया, आलिशान आणि विश्रांतीची जीवनशैलीची खातरजमा करते.


नवीन टॉवरच्या लॉन्चविषयी बोलताना रुणवाल’चे मॅनेजिंग डायरेक्टर संदीप रुणवाल म्हणाले, "रुणवालचा नवीन टॉवर - टॉवर ब्रीझ रुणवाल लँड्स एंड येथे सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. नवीन टॉवर लॉन्च आमच्या खरेदीदारांच्या अपवादात्मक जीवन अनुभवांची पूर्तता करण्यासाठी आहे. आलिशान, आरामदायी आणि नाविन्यपूर्ण गोष्टींचे मिश्रण असलेल्या विलक्षण निवासस्थानांची निर्मिती करण्याच्या आमच्या बांधिलकीचे हा नवीन टॉवर उदाहरण आहे. समकालीन रचना, उच्च दर्जाच्या सुविधा आणि सोयीस्कर स्थानासह, रुणवाल लँड्स एंडने उच्चभ्रू जीवनासाठी एक नवीन मापदंड स्थापित केला आहे.


व्यापक पायाभूत सुविधा विकास आणि मल्टी-मॉडेल कनेक्टिव्हिटीसह, ठाणे येथील कोलशेत भाग विकासकासाठी एक फायदेशीर ठिकाण म्हणून उदयास आले आहे. या भागात असलेली शांतता आणि हवेची गुणवत्ता (एक्यूआय) ही वैशिष्ट्ये पर्यावरणपूरक राहणीमानाचा अनुभव वाढवतात. याव्यतिरिक्त, शैक्षणिक संस्था आणि आसपासच्या भागातील विविध खरेदी तसेच डायनिंग एक्सपिरियन्स विश्रांतीच्या पर्यायांसह सामाजिक-आर्थिक विकास, या प्रदेशातील एकूण मागणीमध्ये आणखी एक प्रमुख योगदान देत आहे.


प्रस्तावित कोलशेत- दक्षिण मुंबई- वसई जलमार्ग, मुंबई मेट्रो मार्ग 4 आणि 5, बोरिवली-ठाणे बोगदा आणि ठाणे रोड अशा सुविधांमुळे दळणवळण सुधारेल. भिवंडी नाका ते लिंक रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत भूमिगत रेल्वे यासारख्या प्रस्तावित प्रकल्पांमुळे सुलभतेत भर पडेल. ही प्रगती कोलशेत भागाची सामाजिक-आर्थिक वाढ, त्याचप्रमाणे एक भरभराटीचे शहरी केंद्र अशी उत्क्रांती दर्शवते.



No comments:

Post a Comment

‘कोण होणार हिटलर?’ या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे मिळाले ‘क्युट’ उत्तर! ‘मु. पो. बोंबीलवाडी’ मध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर

१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि श्री भरत शितोळे यांची मुं...