Saturday, May 25, 2024

ओजस आय हॉस्पिटलने पश्चिम भारतात पहिल्‍यांदाच क्रांतिकारी व्हिजन करेक्‍शन प्रक्रिया ‘एलिटा सिल्‍क' लाँच केले


जागतिक स्‍तरावर मायोपियाच्‍या वाढत्‍या प्रमाणाचे निराकरण करण्‍यासाठी ओजस आय हॉस्पिटलने व्हिजन करेक्‍शन प्रक्रिया ‘एलिटा सिल्‍क' लाँच केले 

  • रूग्‍ण १२ ते २४ तासांच्‍या आत बरे होतात. उपचारासाठी लागणारा कालावधी इतिहासामध्‍ये सर्वात गतीशील
  • ओजस आय हॉस्पिटलची विस्‍तारीकरणाची योजना                                

मुंबई, २५ मे २०२४ (आदर्श महाराष्ट्र): आय केअरमधील सर्वात अचंबित करणारा ट्रेण्‍ड म्‍हणजे मायोपियाचे (दूर दृष्‍टीदोष) वाढते प्रमाण. आज, जगभरातील जवळपास ३० टक्‍के व्‍यक्‍ती मायोपियाने पीडित आहेत आणि २०५० पर्यंत जगभरातील ५० टक्‍के व्‍यक्‍ती या आजाराने पीडित असण्‍याचा अंदाज आहे ज्‍यामुळे हा आजार ५ बिलियन व्‍यक्‍तींना प्रभावित करणारी जागतिक समस्या आहे. मायोपियाच्‍या उपचारामध्‍ये चष्‍मे, कॉन्‍टॅक्‍ट लेन्‍सेस किंवा रूग्‍णाचा रिफ्रॅक्टिव्‍ह एरर म्‍हणजेच अपवर्तक दोष आणि दूर दृष्‍टीदोष सुधारण्‍यासाठी रिफ्रॅक्टिव्‍ह सर्जरी यांचा समावेश असतो. 

प्रगत आय केअरमधील अग्रणी ओजस आय हॉस्पिटलने मुंबईतील बांद्रा (पश्चिम) येथील आपल्‍या प्रमुख केंद्रामध्‍ये नवीन लेझर व्हिजन करेक्‍शन तंत्रज्ञान ‘एलिटा सिल्‍क'च्‍या लाँचची घोषणा केली आहे. या उल्‍लेखनीय तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे हे पश्चिम भारतातील पहिले आय हॉस्पिटल (नेत्र रूग्‍णालय) आहे.   

ओजस आय हॉस्पिटलमध्‍ये चष्‍म्‍याच्‍या नंबरमध्‍ये सुधारणा करण्‍यासाठी एलिटा सिल्‍क लेझर आय सर्जरी लेझर व्हिजन करेक्‍शनमधील मोठी झेप आहे, जे आता मुंबईतील ओजस आय हॉस्पिटलमध्‍ये उपलब्‍ध आहे. ही सर्जरी डोळ्यांचे चष्‍मे व कॉन्‍टॅक्‍ट लेन्‍सेस दूर करण्‍यासाठी जलद, सुरक्षित व ब्‍लेड-लेस सोल्‍यूशन देते. 

पश्चिम भारतात पहिल्‍यांदाच एलिटा सिल्‍कच्‍या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत ओजस आय हॉस्पिटलचे प्रमुख वैद्यकीय संचालक  डॉ. नितीन देढिया म्‍हणाले, “ओजस आय हॉस्पिटलमध्‍ये आम्‍ही सतत आय केअरमधील अत्‍याधुनिक तंत्रज्ञानांचा अवलंब करतो. २०१२ मध्‍ये पहिले ब्‍लेड-लेस लासिक उपचार सादर करण्‍यापासून २०१८ मध्‍ये कॉन्‍टोरा फेम्‍टोसेकंड लेझरमध्‍ये अग्रणी असण्‍यापर्यंत आम्‍हाला बांद्रामधील आमच्‍या प्रमुख केंद्रामध्‍ये एलिटा लेझर लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. दर्जात्‍मक आय केअर देण्‍याप्रती कटिबद्ध एलिटा सिल्‍क लेझर आय सर्जरी २४ तासांमध्‍ये रिकव्‍हरीसह चष्‍मे दूर होण्‍याची, तसेच दृष्‍टीमध्‍ये उत्तम सुधारणा होण्‍याची खात्री देते.'' 

३८ वर्षांपासून लासिक प्रक्रियांमधील जागतिक तज्ञ डॉ. नितीन देढिया यांनी या तंत्रज्ञानाच्‍या व्‍यावसायिक लाँचपूर्वी २०२३ मध्‍ये यूएसएमध्‍ये एलिटा सिल्‍क मशिनचा प्रत्‍यक्ष अनुभव घेतला. डिसेंबर २०२३ मध्‍ये व्‍यावसायिक लाँचपासून ओजस आय हॉस्पिटलमध्‍ये टीमने अेनक सिल्‍क प्रक्रिया यशस्‍वीरित्‍या पूर्ण केल्‍या आहेत आणि रूग्‍णांसाठी सर्वोत्तम निष्‍पत्ती संपादित केल्‍या आहेत, जेथे अनेक रूग्‍णांनी ६/५ व्हिजन प्राप्‍त केले आहे, जे ‘सुपर व्हिजन' म्‍हणून ओळखले जाते.   

जगभरात मायोपियाने पीडित व्‍यक्‍तींच्‍या संख्‍या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रगत व अत्‍यंत अचूक तंत्रज्ञानांच्‍या माध्‍यमातून मायोपियाचे निराकरण करण्‍याची गरज ओळखत ओजस आय हॉस्पिटल हे बांद्रा (पश्चिम) मधील त्‍यांच्‍या केंद्रामध्‍ये कॉन्‍टोरा व्हिजन टेक्‍नॉलॉजीसह हे प्रगत तंत्रज्ञान देणारे पश्चिम भारतातील (महाराष्‍ट्र, गुजराम, मध्‍यप्रदेश व गोवा) एकमेव आय हॉस्पिटल आहे. 

भारतात सिल्‍क आय सर्जरीचा सरासरी खर्च दोन्‍ही डोळ्यांसाठी १२५,००० रूपये ते १५०,००० रूपयांपर्यंत आहे. हा खर्च व्‍यक्‍तींच्‍या गरजांनुसार बदलू शकतो हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. 

सध्‍या, ओजस आय हॉस्पिटल बांद्रा व कांदिवली येथे स्थित आहे, तसेच बांद्रा येथील प्रमुख केंद्र ३ मजल्‍यांचे आहे. ओजस आय हॉस्पिटलमध्‍ये डॉ. नितीन यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत वैद्यकीय टीमने गेल्‍या ३८ वर्षांमध्‍ये जगभरातील ५००,००० हून अधिक रूग्‍णांची दृष्‍टी यशस्‍वीपणे सुधारली आहे. तसेच, हॉस्पिटलने १२५,००० हून अधिक रूग्‍णांवर यशस्‍वीरित्‍या ऑपरेशन करण्‍यासह ५०,००० हून अधिक मोतीबिंदू ऑपरेशन आणि ४०,००० हून अधिक प्रगत लासिक ऑपरेशन केले आहेत. हॉस्पिटलची नजीकच्‍या भविष्‍यात मुंबईतील इतर ठिकाणी नवीन अत्‍याधुनिक केंद्रे सुरू करण्‍याची योजना आहे. 

वेबसाइट: www.ojaseyehospital.com 

No comments:

Post a Comment

‘कोण होणार हिटलर?’ या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे मिळाले ‘क्युट’ उत्तर! ‘मु. पो. बोंबीलवाडी’ मध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर

१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि श्री भरत शितोळे यांची मुं...