Tuesday, May 7, 2024

वागड ग्लोबल स्कूलला मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जा



वागड गुरूकुल नवनिर्माण योजनेच्या माध्यमातून वागड ग्लोबल स्कूलला मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जा

मुंबई, ७ मे २०२४ (आदर्श महाराष्ट्र):  श्री जेठालाल नोनघाभाई गाडा वागड एज्युकेशन वेलफेअर अँड रिसर्च सेंटरतर्फे २००२ सालापासून चालवले जाणाऱ्या वागड ग्लोबल स्कूलला ‘वागड गुरूकुल नवनिर्माण योजने’च्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ७.५० कोटी रुपयांचा निधी संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 

संस्थेचे अध्यक्ष अमृत गाडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विरार महामार्गाजवळ २७ एकर जागेत वागड ग्लोबल स्कूल आहे. या जागेत ५ वसतिगृहे/शाळांच्या इमारती आहेत. नवीन पायाभूत सुविधा आणि अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या सर्व इमारतींचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. तसेच मैदानांचाही विकास केला जाणार आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार (एनईपी) स्मार्ट क्लासेस निर्माण केले जाणार आहेत. 

आता वागड ग्लोबल स्कूल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुरूकुलमध्ये ३०० विद्यार्थ्यांच्या निवासाची तसेच भोजनाची सोय होऊ शकते. ६वी ते १२वी इयत्तांमधील विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाचे शिक्षण दिले जाते. गेल्या २० वर्षांत १२००हून अधिक विद्यार्थी या शाळेतून उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांनी यशस्वी करिअर घडवले आहे. 

शाळा वंचित समुदायांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व गरजेवर आधारित आर्थिक सहाय्य देऊ करते. यात पात्र विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचीही तरतूद आहे.

No comments:

Post a Comment

"The Reflection of Mind" Group exhibition of Paintings by 3 reputed artists from Kolkata At Hirji Jehangir Art Gallery, Kala Ghoda, Mumbai

The Reflection of Mind, At Hirji Jehangir Art Gallery, Kala Ghoda, Mumbai, From 21st to 27th April, 2025 MUMBAI, 20 APRIL, 2025 (AMN):  Grou...