Sunday, May 12, 2024

बँक ऑफ बडोदा’च्या वतीने 31 मार्च 2024 रोजी संपणाऱ्या तिमाही आणि वित्तीय वर्षाचे आर्थिक निकाल घोषित


मुंबई १२ मे २०२४ (AMN): बँक ऑफ बडोदा’च्या वित्तीय वर्ष 20203-24 च्या निव्वळ नफा 26.1 टक्क्यांनी वाढून रु. 17,789 कोटी.

ठळक मुद्दे

  • 31 मार्च 2024 रोजी वैश्विक व्यवसायात 11.2% ची वृद्धी ने रु. 24,17,464 कोटीं झाले.
  • आर्थिक वर्ष 2023- 24 च्या चौथ्या तिमाहीसाठी निव्वळ नफा वर्ष दरवर्ष 2.3% ची वाढ हौऊन 4,886 कोटी रुपयांपर्यंत.
  • मालमत्तेवरील प्रतिलाभ (ROA) वर्षाकाठी 14 बीपीएसने वाढला, आर्थिक वर्ष 2023-24 साठी 1.17% राहिला.
  • आर्थिक वर्ष 2023 – 24 साठी इक्विटीवरील प्रतिलाभ (ROE) वर्ष दरवर्ष 61 बीपीएसने वाढून 18.95% राहिला.
  • आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये वर्ष दरवर्ष 15.3% च्या स्वस्थ उत्पन्नाच्या वाढीमुळे नफ्यात वाढ.
  • आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये गैर-व्याज उत्पन्न (नॉन इंटेरेस्ट इन्कम) मध्ये वर्ष दरवर्ष 44.6% ची वाढ होऊन रु. 14,495 कोटी रुपये राहिला.
  • आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कामकाज नफा (ऑपरेटिंग प्रॉफिट) वर्ष दरवर्ष 15.3% नी वाढ नोंदवली आणि 30,965 कोटी रुपयांचा आकडा गाठला.
  • आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत जागतिक निव्वळ व्याज मार्जिन (NIM) दर 3.27% राहिला, वर्ष दरवर्ष 17 बीपीएसने सुधारले.
  • आर्थिक वर्ष 2023-24 करिता निव्वळ व्याज मार्जिन (नेट इंटेरेस्ट मार्जिन – NIM) 3.18% राहिला.
  • आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत आपल्या मालमत्तेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा केली असून GNPA मध्ये 87 बीपीएस वार्षिक घट होऊन 3.79% वरून 2.92% पर्यंत घट झाली आहे.
  • बँकेचा NNPA आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत वर्ष दरवर्ष 21 bps ने कमी होऊन 0.68% झाला, जो आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत 0.89% होता.
  • बँकेचा तुलन-पत्र सुदृढ़ झला आणि ह्याच्या प्रावधान कवरेज अनुपात (PCR) TWO सह 93.30% आणि TWO शिवाय 77.34% राहिला.
  • कर्ज खर्च आर्थिक वर्ष 2023-24 साठी 1% नी कमी राहुन 0.67% आणि तिमाहीसाठी 0.57% राहिला.
  • 31 मार्च 2024 पर्यंत चलनिधि कव्हरेज अनुपात (LCR)120.6% नी मजबुत राहिले.
  • बँकेचा च्या ग्लोबल अॅडव्हान्सेसने आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत 12.5% ची वार्षिक वाढ नोंदवली. वाहन कर्ज (23.8 टक्के), गृह कर्ज (14.1 टक्के), वैयक्तिक कर्ज (51.6 टक्के), तारण कर्ज (11.4 टक्के), शिक्षण कर्ज (19.6 टक्के) अशा विविध विभागांमध्ये मजबूत वाढ झाल्याने बँकेच्या ऑर्गनिक रिटेल अॅडव्हान्सेसमध्ये 20.7 टक्क्यांनी वाढ झाली

नफा

  • बँकेचा आर्थिक वर्ष 2023 – 24 च्या चौथ्या तिमाहीत रु. 4,886 कोटीचा निव्वळ नफा नोंदवला, तर आर्थिक वर्ष 2022 – 23 च्या चौथ्या तिमाहीत रु. 4,775 कोटीचा नफा नोंदविण्यात आला होता. आर्थिक वर्ष 2023 – 24 साठी निव्वळ नफा रु. 17,789 कोटी (+26.1% वर्ष दरवर्ष) आहे, जो आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रु. 14,110 कोटी होता.
  • आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न (NII) वर्ष दरवर्ष 2.3 टक्क्यांनी वाढून रु. 11,793 कोटी झाले. आर्थिक वर्ष 2023 – 24 साठी NII ने 8.1% वाढ नोंदवली आणि ती रु. 44,722 कोटी इतकी आहे.
  • या तिमाहीत गैर-व्याज उत्पन्न (नॉन इंटेरेस्ट इन्कम) 20.9 टक्क्यांनी वाढून रु. 4,191 कोटी झाले. आर्थिक वर्ष 2023 – 24 साठी गैर-व्याज उत्पन्न (नॉन इंटेरेस्ट इन्कम) 44.6 टक्क्यांनी वर्ष दरवर्ष वाढून रु. 14,495 कोटी झाले.
  • आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत ग्लोबल NIM मध्ये 3.27% होता तो क्रमिक रुपाने  17 bps ची सुधारणा झाली असून हा दर 3.18 टक्के झाला.
  • कर्जावर उपलब्ध जे आर्थिक वर्ष 23 च्या चौथ्या तिमाहीत 8.47% होते ते आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत (इन्कम ऑन अॅडव्हान्सेस) 8.75% पर्यंत वाढले,.
  • आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत ठेवींचा खर्च (कॉस्ट ऑफ डिपॉझीट) आर्थिक वर्ष 23च्या चौथ्या तिमाही मधील 4.43% च्या तुलनेत 5.06% पर्यंत वाढला.
  • आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत कामकाज उत्पन्न (ऑपरेटिंग इन्कम) रु. 15,984 कोटी आहे. आर्थिक वर्ष 24 साठी कामकाज उत्पन्न 15.3% वाढ नोंदवत रु. 59,217 कोटी झाले.
  • आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत कामकाज नफा (ऑपरेटिंग प्रॉफिट) रु. 8,106 कोटी आणि वित्तीय वर्ष 24 साठी कामकाज नफा 15.3 टक्क्यांनी वाढून रु 30,965 कोटी झाला.
  • आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीसाठी खर्च आणि उत्पन्न अनुपात (कॉस्ट ऑफ इन्कम रेशो) 49.29% आहे.
  • मालमत्तेवरील प्रतिलाभ (वार्षिक) अनुक्रमे 5 bps ने सुधारला आणि आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत हा दर 1.25% आहे. आर्थिक वर्ष 24 साठी ते 1.17% वर आहे जे वर्ष दरवर्ष 14 bps ने वाढले आहे.
  • आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीसाठी इक्विटीवरील प्रतिलाभ (वार्षिक) 20.83% आहे. आर्थिक वर्ष 24 साठी वर्ष दरवर्ष 61 बीपीएसने वाढून 18.95% झाला.
  • आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत इक्विटीवरील प्रतिलाभ (वार्षिक) 20.83% आहे. आर्थिक वर्ष 24 छाया चौथ्या तिमाही साठी RoE 61 bps ने वाढून 18.95% झाला.
  • एकत्रित इकाई करता, आर्थिक वर्ष 24 मध्ये निव्वळ नफा 18,767 कोटी रुपये होता, जो आर्थिक वर्ष 23 मध्ये रु 14,905 कोटी होता.

मालमत्तेची गुणवत्ता

  • आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत बँकेची सकल एनपीए 13.4% ने कमी होऊन रु 31,834 कोटी झाली आणि आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत सकल एनपीए गुणोत्तर सुधारून 2.92% झाले, जे आर्थिक वर्ष 23 च्या चौथ्या तिमाहीत 3.79% होते.
  • बँकेचे निव्वळ एनपीए गुणोत्तर आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत 0.68% आहे, तर आर्थिक वर्ष 23 च्या चौथ्या तिमाहीत 0.89% होते.
  • आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत बँकेचे प्रोव्हिजन कव्हरेज रेशो TWO सह 93.30% आणि TWO वगळता 77.34% होते.
  • आर्थिक वर्ष 24 साठी स्लिपेज प्रमाण (स्लिपेज रेशो) 0.99% पर्यंत घसरले आहे, जे आर्थिक वर्ष 23 मध्ये 1.07% होते. या तिमाहीत स्लिपेज प्रमाण 1.12 % होते.
  • आर्थिक वर्ष 24 च्या चौथ्या तिमाहीत कर्जावर लागनारा खर्च (क्रेडिट कॉस्ट) 0.57% आणि आर्थिक वर्ष 24 साठी तो 0.67% आहे.

पूंजी पर्याप्तता

  • मार्च 24 मध्ये बँकेचा CRAR 16.31% होता. टियर-I 14.07% (CET-1 12.54%, AT1 1.53%) आणि टियर-II मार्च 24 पर्यंत 2.24% होते.
  • समेकित ईकाई CRAR आणि CET-1 अनुक्रमे 16.68% आणि 13.02% राहिला.
  • एकत्रित लिक्विडिटी कव्हरेज रेशो (LCR) 120.6% आहे.

व्यवसाय कामगिरी

  • बँकेची वैश्विक कर्ज  रक्कम (ग्लोबल अॅडव्हान्सेस) रु. 10,90,506 कोटीपर्यंत वाढली, जे वर्ष दरवर्ष 12.5% आहे.
  • बँकेची घरेलू कर्ज रक्कम (डोमॅस्टिक अॅडव्हान्सेस) रु. 8,98,116 कोटीपर्यंत वाढली, जे वर्ष दरवर्ष 12.9% आहे.
  • जागतिक ठेवी (ग्लोबल डिपॉझीट) वार्षिक आधारावर 10.2 टक्क्यांनी वाढून रु. 13,26,958 कोटीवर गेल्या आहेत.
  • मार्च 24 मध्ये घरेलू ठेवी (डोमॅस्टिक डिपॉझीट) 7.7 टक्क्यांनी वाढून रु. 11,28,514 कोटी झाले.
  • देशांतर्गत CASA ठेवी (डोमॅस्टिक CASA डिपॉझीट) मध्ये वर्ष दरवर्ष 5.4% वाढ नोंदवली गेली असून 31 मार्च 2024 पर्यंत ती 4,66,401 कोटी रुपये झाली आहे.
  • मार्च 24 मध्ये आंतरराष्ट्रीय ठेवी (इंटरनॅशनल डिपॉझीट) वार्षिक आधारावर 27% ने वाढून 1,98,444 कोटी रुपये झाल्या.
  • वाहन कर्ज (23.8 टक्के), गृह कर्ज (14.1 टक्के), वैयक्तिक कर्ज (51.6 टक्के), तारण कर्ज (11.4 टक्के), शैक्षणिक कर्ज (19.6 टक्के) अशा विविध विभागांमध्ये ऑर्गनिक रिटेल अॅडव्हान्स मध्ये 20.7 टक्क्यांनी वाढ झाली.
  • कृषी कर्ज (अॅग्रीकल्चर लोन)चा पोर्टफोलिओ 11.6 टक्क्यांनी वाढून रु. 1,38,640 कोटी झाला आहे.
  • एकूण सुवर्ण कर्ज (गोल्ड लोन) पोर्टफोलिओ (रिटेल आणि कृषीसह) वार्षिक आधारावर 24.1% वाढ नोंदवत रु. 47,472 कोटी झाला आहे.
  • ऑर्गनिक एमएसएमई पोर्टफोलिओ वर्षाकाठी 10.4 टक्क्यांनी वाढून रु 1,19,415 कोटी झाला आहे.
  • कॉर्पोरेट अॅडव्हान्समध्ये वर्ष दरवर्ष आधार वर 11.6 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून ती रु. 3,79,747 कोटी आहे.

No comments:

Post a Comment

मुंबई व भारतातील कलाकारांचा अनोखा फेस्टिवल “सेलिब्रेशन ऑफ सेरॅमिक्स”दि. २३ व २४ नोव्हेंबर रोजी वांद्रेच्या पाटकर बंगल्याच्या भव्य मैदानामध्ये

मुबई (प्रतिनिधी):  स्टुडिओ पॉटर्स मार्केटच्या वतीने खास कलाप्रेमी व रसिकांसाठी एक अनोखा फेस्टिवल “सेलिब्रेशन ऑफ सेरॅमिक्स” वांद्रे (प) येथील...