Friday, February 2, 2024

एका मोबिलिटीकडून भारतताील पहिली १.५-टन इलेक्ट्रिक एलसीव्‍ही श्रेणी एका के१.५ लाँच




 १३.९ लाख* रूपयांच्‍या (एक्‍स-शोरूम) अत्‍यंत स्‍पर्धात्‍मक सुरूवातीच्‍या किमतीत लाँच करण्‍यात आलेली एका के१.५ उद्योगामधील तिच्‍या विभागातील देते सर्वोच्‍च पेलोड क्षमता आणि सर्वात कमी टीसीओ 

 विविध व्‍हेरिएण्‍ट्ससह एका के१.५ ८ हून अधिक उपयोजनांसाठी सानुकूल करता येऊ शकते, ज्‍यामुळे ही तिच्‍या विभागातील सर्वात वैविध्‍यपूर्ण इलेक्ट्रिक एलसीव्‍ही श्रेणी आहे 

 शून्‍य उत्‍सर्जन, मोठ्या क्षमतेची बॅटरी आणि प्रतिदिन विविध युज सायकल्‍स एका के१.५ ला सर्वात शाश्‍वत व लाभदायी लॉजिस्टिक्‍स एलसीव्‍ही सोल्‍यूशन बनवतात, जी पूर्णत: भारतात डिझाइन व निर्माण करण्‍यात आली आहे 

 एका के१.५ श्रेणी ३०० व्‍होल्‍ट्स इलेक्ट्रिकल सिस्‍टम आर्किटेक्‍चरवर निर्माण करण्‍यात आली आहे, जे ६० केडब्‍ल्‍यूची उद्योगामधील अग्रणी सर्वोच्‍च शक्‍ती, तसेच कार्यक्षम फास्‍ट चार्ज क्षमता देते 

नवी दिल्‍ली, २ फेब्रुवारी २०२४ (PNT) - एका ही इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी इक्विटी भागीदार मित्‍सुई कं. लि. (जपान) आणि व्‍हीडीएल ग्रुप (नेदरलँड्स) यांच्‍यासह बहुप्रतिक्षित १.५ टन इलेक्ट्रिक लाइट कमर्शियल वेईकल्‍स (एलसीव्‍ही) लाँच करत व्‍यावसायिक वाहन क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यास सज्‍ज आहे. प्रतिष्ठित भारत मोबिलिटी ग्‍लोबल एक्‍स्‍पो येथे या वेईकल्‍सचे भव्‍य लाँच करण्‍यात आले, जेथे एका मोबिलिटीने शाश्‍वत व लाभदायी परिवहन सोल्‍यूशन्‍सप्रती आपली कटिबद्धता दाखवली. 

एका मोबिलिटीचे १.५-टन इलेक्ट्रिक एलसीव्‍ही आधुनिक लॉजिस्टिक्‍स व परिवहन उद्योगाच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. पर्यावरणाप्रती जागरूक गतीशीलतेवर लक्ष केंद्रित करत या इलेक्ट्रिक एलसीव्‍ही अपवादात्‍मक कार्यक्षमता, कमी कार्यसंचालन खर्च आणि कमी पर्यावरणीय फूटप्रिंटची खात्री देतात. कंपनीने एक्‍स्‍पोमध्‍ये पूर्णत: भारतात डिझाइन व उत्‍पादित करण्‍यात आलेली भारतातील सर्वात प्रगत इलेक्ट्रिक बस - त्‍यांची ९-मीटर इलेक्ट्रिक बस एका ९ स्‍टाफ बसला देखील दाखवले. 

लाँचप्रसंगी बोलताना एका मोबिलिटीचे संस्‍थापक व अध्‍यक्ष श्री. सुधीर मेहता म्‍हणाले, ''आमच्‍या इलेक्ट्रिक एलसीव्‍ही जागतिक स्‍तरावरील व्‍यावसायिक परिवहनाच्‍या क्रांतीच्‍या दिशेने मोठे पाऊल आहेत. आम्‍हाला विश्‍वास आहे की, या वेईकल्‍स उद्योगाच्‍या मागण्‍यांची पूर्तता करतील, तसेच शाश्‍वतता व कार्यक्षमतेसाठी नवीन मानक देखील स्‍थापित करतील. आमचा कमर्शियल इलेक्ट्रिक वेईकल्‍समधील जागतिक अग्रणी कंपनी बनण्‍याचा दृष्‍टीकोन आहे. आमचे भारतीय ईव्‍ही उद्योगामध्‍ये प्रबळ आयपी निर्मिती, दर्जात्‍मक टोटल कॉस्‍ट ऑफ ऑपरेशन (टीसीओ) ऑफरिंग आणि पूर्णत: स्‍वदेशी व उद्योग-अग्रणी सॉफ्टवेअर आहे. आम्‍हाला आमचे सहयोगी म्‍हणून दोन आघाडीच्‍या जागतिक समूहांचे पाठबळ असणारी एकमेव ईव्‍ही कंपनी असण्‍याचा अभिमान आहे आणि आम्‍ही शाश्‍वत व लाभदायी सोल्‍यूशन्‍सच्‍या माध्‍यमातून व्‍यावसायिक गतीशीलता क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यास उत्‍सुक आहोत.'' 

एकाच्‍या इलेक्ट्रिक एलसीव्‍ही विविध उपयोजनांसाठी डिझाइन करण्‍यात आल्‍या आहेत, ज्‍यामधून एका मोबिलिटीची वैविध्‍यतेप्रती कटिबद्धता दिसून येते. या वेईकल्‍स विविध उद्देशांसाठी सानुकूल करता येऊ शकतात, ज्‍यामुळे लास्‍ट-माइल डिलिव्‍हरी, ई-कॉमर्स लॉजिस्टिक्‍स, तापमान-संवेदनशील शिपमेंट्स अशा कामांसाठी उपयुक्‍त आहेत. एका के१.५ श्रेणी ३०० व्‍होल्‍ट्स इलेक्ट्रिकल सिस्‍टम आर्किटेक्‍चरवर निर्माण करण्‍यात आली आहे, जे उद्योगामधील ६० केडब्‍ल्‍यूची सर्वोच्‍च शक्‍ती, तसचे दर्जात्‍मक वेईकल कार्यक्षमता देते. वेईकल आणि बॅटरीवर विनासायास वापरासाठी दर्जात्‍मक वॉरंटी आहे. 

कंपनी सध्‍या ग्राहकांच्‍या आवश्‍यकतांना अनुसरून लोड बॉडी कस्‍टमायझेशन्‍ससह पुढील उपयोजनांमध्‍ये एका के१.५ प्रदान करत आहे: 

 अॅल्‍युमिनिअम कंटेनर बॉडी  साइड ओपन अॅल्‍युमिनिअम कंटेनर बॉडी  एमएस कंटेनर बॉडी  ओपन टॉप कंटेनर बॉडी / रेज लोड बॉडी  मार्केट लोड्ससाठी हाफ लोड बॉडी  कोल्ड चेन अॅप्लिकेशन्ससाठी युटेक्टिक कंटेनर  इन्‍सुलेटेड बॉक्‍स कंटेनर बॉडी  गारबेज कलेक्‍टर बॉडी एका मोबिलिटीच्‍या अग्रणी वैशिष्‍ट्यांपैकी एक म्‍हणजे कंपनी स्‍वदेशी सॉफ्टवेअर विकासावर भर देते. थर्ड-पार्टी सोल्‍यूशन्‍स किंवा इतरत्र होस्‍ट केल्‍या जाणाऱ्या सेंट्रल डेटाबेसेसवर अवलंबून असलेल्‍या इतर अनेक प्रतिस्‍पर्धींच्‍या तुलनेत एकाने आपली सॉफ्टवेअर इकोसिस्‍टम तयार करण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, जी वेईकल्‍स व ग्राहकांच्‍या अद्वितीय गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कस्‍टमायझेशन व ऑप्टिमायझेशन करता येण्‍यासह उच्‍च दर्जाची सुरक्षितता व विश्‍वसनीयतेची खात्री देखील मिळते. 

प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर वेईकल्‍सना शक्‍ती देण्‍यासोबत एकसंधी कनेक्‍टीव्‍हीटी देखील देते, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना प्रगत वैशिष्‍ट्ये आणि भावी ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. एक्‍स्‍पोमध्‍ये कंपनी कार्यक्षम व पर्यावरणदृष्‍ट्या अनुकूल शहरी लॉजिस्टिक्‍ससाठी डिलिव्‍हरी व्‍हॅन अॅप्‍लीकेशन दाखवत आहे आणि त्‍यांच्‍या नाविन्‍यपूर्ण युटेक्टिक व्‍हॅन तापमान-संवेदनशील कार्गो परिवहनासाठी प्रगत तंत्रज्ञान व सोल्‍यूशन्‍सचा शोध घेण्‍याप्रती एका मोबिलिटीची कटिबद्धता दाखवत आहे. या वर्षाच्‍या सुरूवातीला एकाने मित्‍सुई अॅण्‍ड कं. लि. (जपान) आणि व्‍हीडीएल ग्रुप (नेदरलँड्स) यांच्‍यासोबतच्‍या सहयोगाची घोषणा केली, ज्‍याअंतर्गत भारताला इलेक्ट्रिक वेईकल्‍ससाठी जागतिक उत्‍पादन व सोर्सिंग हब बनवण्‍यासाठी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सहून अधिक (जवळपास ८५० कोटी रूपये) संयुक्‍त गुंतवणूक करण्‍यात येईल. नुकतेच, कंपनीने ग्रीनसेल मोबिलिटीसोबत सहयोगाची देखील घोषणा केली. या सहयोगांतर्गत ग्रीनसेल मोबिलिटीला पुढील पाच वर्षांमध्‍ये १२-मीटर आणि १३.५-मीटर श्रेणींमधील १००० आंतरशहरीय इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्‍यात येईल. एका मोबिलिटी ही भारत सरकारच्या ऑटो पीएलआय धोरणाच्या चॅम्पियन ओईएम योजना आणि ईव्ही युनिट उत्पादन योजनेअंतर्गत मंजूर व्यावसायिक वाहन उत्पादकांपैकी एक आहे. 

एका ही भारतातील इलेक्ट्रिक नवीन ऊर्जा व्यावसायिक वाहनांचे एंड-टू-एंड डिझाइन, उत्पादन आणि तंत्रज्ञान ऑफर करणार्‍या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने महाराष्ट्रातील पुणे येथे एक अत्याधुनिक संशोधन, विकास, अभियांत्रिकी आणि नवप्रवर्तन केंद्र स्थापन केले आहे आणि तिच्याकडे सध्या ७०० हून अधिक इलेक्ट्रिक बसेस आणि ५००० हून अधिक इलेक्ट्रिक हलक्या व्‍यावसायिक वाहनांच्या ऑर्डर्स आहेत. ही सर्व वाहने भारतात मध्य प्रदेश व महाराष्ट्रात एकाच्या प्रस्तावित आणि चालू असलेल्या अत्याधुनिक उत्पादन सुविधांमध्ये डिझाइन आणि उत्पादित केली जातील. ---------------------------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment

चित्रकार पूनम राठी यांच्या चित्रप्रदर्शनास कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद २७ ऑक्टोबर पर्यंत नेस्को ग्राउंड गोरेगाव येथे

मुंबई (वार्ताहर):   प्रसिध्द चित्रकार पूनम राठी यांचे चित्र प्रदर्शन नेस्को ग्राउंड, गोरेगाव येथे सुरू असून त्याला कलारसिकांचा उत्स्फूर्त प्...