Sunday, January 28, 2024

हिंदुस्थान पेन्सिलचे क्रेझी किड्स कार्निव्हल उत्साहात संपन्न






मुंबई, 28 जानेवारी, 2024 (AMN): मुंबईतील नेस्को ग्राउंड गोरेगाव येथे तीन दिवसीय क्रेझी किड्स कार्निव्हल चे आयोजन करण्यात आले होते. हिंदुस्थान पेन्सिलच्या क्रेझी किड्स कार्निव्हलमध्ये लहान मुलांनी त्यांचे हस्तकला आणि चित्रकलेचे कौशल्य दाखवून विविध खेळांचा आनंद लुटला. या दोन विभागामध्ये विभागल्या गेलेल्या कला विभागात हिंदुस्थान पेन्सिलच्या रंगीत पेन्सिल ते विविध सामग्रीच्या सहाय्याने मुलांनी नाविन्‍यपूर्ण रेखाकृती ची रचना केली होती . 

यावेळी मुलांच्या पालकांनी गर्दी केली होती ;त्यावेळी पालकांना संबोधून हिंदुस्थान पेन्सिलचे अध्यक्ष श्री प्रदिप उघाडे म्हणाले की, ६व्या क्रेझी किड्स कार्निव्हलमध्ये मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देताना आम्हाला अधिक आनंद होत आहे. हिंदुस्थान पेन्सिल प्रेरणादायी पिढ्यांचा समृद्ध वारसा घेउन सतत सहभाग, मनोरंजन आणि शिक्षणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. Ends



No comments:

Post a Comment

"The Reflection of Mind" Group exhibition of Paintings by 3 reputed artists from Kolkata At Hirji Jehangir Art Gallery, Kala Ghoda, Mumbai

The Reflection of Mind, At Hirji Jehangir Art Gallery, Kala Ghoda, Mumbai, From 21st to 27th April, 2025 MUMBAI, 20 APRIL, 2025 (AMN):  Grou...