Wednesday, January 10, 2024

रेनॉने रेनॉल्यूशन इंडिया २०२४ सह भारताप्रती धोरण प्रबळ केले: ३ वर्षांमध्‍ये ५ लाँचेसची योजना आणि २०२४ श्रेणीमधील नवीन व्‍हेरिएण्‍ट्ससह पोर्टफोलिओमध्‍ये वाढ .


मुंबई, 10 जानेवारी 2024 (AMN):
 - रेनॉ इंडियाला रेनॉल्यूशन  इंडिया २०२४ अंतर्गत भारतातील बाजारपेठेप्रती आपल्‍या कटिबद्धतेमधील लक्षणीय सुधारणेची घोषणा करताना आनंद होत आहे. या धोरणात्‍मक उपक्रमांतर्गत फ्रेंच कारमेकरची पुढील तीन वर्षांमध्‍ये पाच उत्‍पादने लाँच करण्‍याची योजना आहे. हे रेनॉ ब्रॅण्‍डने नुकतेच युरोपबाहेरील चार प्रमुख आंतरराष्ट्रीय केंद्रांसाठी जाहीर केलेल्या ३ बिलियन युरो गुंतवणूकीव्यतिरिक्त आहे, या चार केंद्रांमध्‍ये भारताचा देखील समावेश आहे.

लाँच करण्‍यात येणाऱ्या पाच उत्‍पादनांमध्‍ये पूर्णत: नवीन मॉडेल्‍स आणि कायगर व ट्रायबरच्‍या नेक्‍स्‍ट जनरेशनचा समावेश आहे. 'मेक इन इंडिया' दृष्टिकोनाप्रती आपल्‍या कटिबद्धतेशी बांधील राहत रेनॉ इंडियाने प्रबळ स्‍थानिक उपस्थिती राखली आहे, ज्‍याला त्‍यांचे चेन्‍नई उत्‍पादन प्‍लांट, लॉजिस्टिक्‍स अॅण्‍ड टेक्‍नॉलॉजी सेंटर आणि डिझाइन स्‍टुडिओ यांचे पाठबळ आहे. रेनॉ स्‍थानिक उत्‍पादन व नाविन्‍यतेप्रती आपली कटिबद्धता दृढ करत आहे. 

रेनॉ इंडिया ऑपरेशन्‍सचे कंट्री सीईओ व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. वेकंटराम ममिल्‍लापल्‍ले म्‍हणाले, ''पुढील तीन वर्षांमध्‍ये आम्‍ही पाच उत्‍पादन लाँचेससह उत्‍साहवर्धक प्रवास सुरू करण्‍यास सज्‍ज आहोत, ज्‍यामध्‍ये पूर्णत: नवीन मॉडेल्‍स आणि आमच्‍या विद्यमान उत्‍पादन श्रेणीमधील नेक्‍स्‍ट जनरेशनचा समोवश आहे. या लक्षणीय पुढाकारामधून आमची कटिबद्धता दिसून येते, तसेच भारतातील बाजारपेठेत नवीन रेनॉ ब्रॅण्‍ड ओळख देखील सादर होते. आमचा अपवादात्‍मक मूल्‍य प्रदान करण्‍याचा, आनंददायी अनुभव निर्माण करण्‍याचा आणि रेनॉ मालकांमध्‍ये अभिमानाची नवीन भावना जागृत करण्‍याचा प्रमुख उद्देश आहे.'' 

भारतात रेनॉल्यूशनची सुरूवात म्‍हणून फ्रेंच कारमेकर नवीन २०२४ श्रेणीच्‍या लाँचसह आपल्‍या विद्यमान उत्‍पादन पोर्टफोलिओमध्‍ये प्रबळ भर करत आहे. नवीन श्रेणीमध्‍ये तीन मॉडेल्‍सदरम्‍यान १० हून अधिक नवीन दर्जात्‍मक वैशिष्‍ट्ये आहेत. ग्राहकांच्‍या विविध व वाढत्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आणि व्‍यापक सेगमेंट कव्‍हरेजच्‍या खात्रीसाठी ५ नवीन व्‍हेरिएण्‍ट्स लाँच करण्‍यात आले आहेत, ज्‍यामध्‍ये ईजी-आर एएमटी तंत्रज्ञान असलेल्‍या भारतातील सर्वात किफायतशीर ऑटोमॅटिक कारचा समावेश आहे. एकूण, प्रत्‍येक व्‍हेरिएण्‍ट कन्‍टेन्‍ट व किमतीच्‍या संदर्भात विशेषरित्‍या स्थित आहे, ज्‍यामुळे संपूर्ण श्रेणी अधिक प्रमाणात उपलब्‍ध असण्‍यासोबत ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल. 

ठळक वैशिष्‍ट्ये: रेनॉ क्विड २०२४ 

नवीन २०२४ क्विड श्रेणीमध्‍ये डिझाइन दर्जा वाढवण्‍यात आला आहे, जेथे पाचपैकी एक उत्‍पादन क्विड क्लिंबरमध्‍ये तीन नवीन ड्युअल-टोन एक्‍स्‍टीरिअर बॉडी कलर्स सादर करण्‍यात आले आहे. ज्‍यामुळे ए-सेगमेंटमध्‍ये ऑफर करण्‍यात आलेली सर्वात व्‍यापक ड्युअल-टोन श्रेणी आहे. ग्राहकांसाठी आरामदायीपणामध्‍ये करण्‍यात आलेल्‍या सुधारणांमध्‍ये आरएक्‍सएल (ओ) व्‍हेरिएण्‍टमधील ८-इंच टचस्क्रिन मीडिया एनएव्‍ही सिस्‍टमचा समावेश आहे, ज्‍यामुळे क्षेत्रातील टचस्क्रिन मीडिया एनएव्‍हीसह सर्वात किफायतशीर हॅचबॅक आहे. तसेच, बाजारपेठेतील वाढत्‍या ऑटोमॅटिक खरेदीदारांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी २०२४ क्विड श्रेणीमध्‍ये आरएक्‍सएल (ओ) ईजी-आर एएमटी व्‍हेरिएण्‍ट सादर करण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे ही भारतातील बाजारपेठेत उपलब्‍ध असलेली सर्वात किफायतशीर ऑटोमॅटिक कार आहे. सुरक्षिततेमध्‍ये वाढ करत सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये आता रिअर सीटबेल्‍ट रिमाइंडर आहे. प्रमाणित म्‍हणून १४ हून अधिक सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह क्विड दर्जात्‍मक सुरक्षिततेसह येते. तसेच, संपूर्ण श्रेणी प्रत्‍येक व्‍हेरिएण्‍टमधील किंमत व कन्‍टेन्‍ट संदर्भात अधिक मूल्‍य प्रदान करण्‍यास सज्‍ज आहे, ज्‍यामुळे ही श्रेणी अधिक परवडणारी असून ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल. 

ठळक वैशिष्‍ट्ये: रेनॉ ट्रायबर २०२४

नवीन २०२४ ट्रायबर श्रेणीमधील आरामदायीपणामध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे, तसेच सोयीसुविधा वाढवणाऱ्या वैशिष्‍ट्यांची भर करण्‍यात आली आहे जसे ड्रायव्‍हर सीट आर्मरेस्‍ट आणि पॉवरफोल्‍ड आऊटसाइड रिअर-व्‍ह्यू मिरर्स (ओआरव्‍हीएम). तंत्रज्ञान सुधारणांमध्‍ये ७-इंच टीएफटी इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर आणि वायरलेस चार्जरचा समावेश आहे, जे आधुनिक ड्रायव्‍हर्सच्‍या गरजांची पूर्तता करतात. नवीन स्टिल्थ ब्‍लॅक बॉडी कलरच्‍या सादरीकरणासह ट्रायबरचा डिझाइन दर्जा अधिक सुधारण्‍यात आला आहे. विविध व्‍हेरिएण्‍ट्समधील आरामदायीपणा व्‍यतिरिक्‍त आरएक्‍सटी व्‍हेरिएण्‍ट आता रिअरव्ह्यू कॅमेरा आणि रिअर वायपरसह येते. आरएक्‍सएल व्‍हेरिएण्‍टमध्‍ये रिअर एसीसह दुसऱ्या व तिसऱ्या रांगेसाठी समर्पित एसी कंट्रोल व वेण्‍ट्स आहेत, तसेच सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये एलईडी केबिन लॅम्‍प्‍सची भर करण्‍यात आली आहे. याव्‍यतिरिक्‍त केबिनमधील हवा शुद्ध ठेवण्‍यासाठी पीएम२.५ एअर फिल्‍टर सादर करण्‍यात आले आहे. सुरक्षिततेत वाढ करत सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये आता रिअर सीटबेल्‍ट रिमाइंडर आहे. प्रमाणित म्‍हणून १५ हून अधिक सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह कारला प्रौढ प्रवाशी सुरक्षिततेत ४ स्‍टार जी-एनसीएपी रेटिंग मिळाले आहे. एकूण, ट्रायबर २०२४ श्रेणी प्रत्‍येक व्‍हेरिएण्‍टसह ग्राहकांना प्रबळ मूल्‍य प्रदान करण्‍यास सज्‍ज आहे, तसेच ग्राहकांना बाजारपेठेत उपलब्‍ध असलेली भारतातील सर्वात किफायतशीर ऑटोमॅटिक ७-सीटर प्रदान करते. 

ठळक वैशिष्‍ट्ये: रेनॉ कायगर २०२४ 

नवीन २०२४ कायगर श्रेणी ग्राहकांना अधिक प्रिमिअम अनुभव व सुधारित आरामदायीपणा देते. नवीन लक्‍झरीअस सेमी-लेदरेट सीट्स आणि लेदरेट स्टीअरिंग व्‍हील प्रिमिअम अनुभव देतात. तंत्रज्ञान सुधारणांमध्‍ये वेलकम-गुडबाय सीक्‍वेन्‍ससह ऑटो फोल्‍ड आऊटसाइड रिअर-व्‍ह्यू मिरर्स (ओआरव्‍हीएम) आणि बेझेल-लेस ऑटोडिम इनसाइड रिअर-व्‍ह्यू मिरर (आयआरव्‍हीएम) आहे. टर्बो इंजिनवरील रेड ब्रेक कॅलिपरसह कायगरच्‍या स्‍पोर्टीनेसमध्‍ये अधिक सुधारणा करण्‍यात आली आहे. वाढत्‍या मागण्‍यांची पूर्तता करत २०२४ श्रेणी सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह सुसज्‍ज आहे, जसे ऑटो एसी, आरएक्‍सटी (ओ) व्‍हेरिएण्‍टमधून सादर करण्‍यात आलेले पॉवरफोल्‍ड ओआरव्‍हीएम, आरएक्‍सझेड एनर्जी व्‍हेरिएण्‍टमधील क्रूझ कंट्रोल आणि सर्व व्‍हेरिएण्‍ट्समधील एलईडी केबिन लॅम्‍प्‍स. अधिक सुरक्षिततेसाठी सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये आता रिअर सीटबेल्‍ट रिमाइंडर आहे. ही कायगर १५ हून अधिक सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देते. तसेच, लाइन अपमध्‍ये एनर्जी मॅन्‍युअल व ईजी-आर एएमटी पॉवरट्रेन्‍स असलेली नवीन आरएक्‍सएल व्‍हेरिएण्‍ट आणि टर्बो मॅन्‍युअल व एक्‍स-ट्रॉनिक सीव्‍हीटी पॉवरट्रेन असलेली आरएक्‍सटी (ओ) व्‍हेरिएण्‍टची भर करण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे व्‍यापक बाजारपेठ विभागाची पूर्तता करण्‍यासाठी श्रेणीमध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे. एकूण, कायगर २०२४ प्रत्‍येक व्‍हेरिएण्‍टसह ग्राहकांना प्रबळ मूल्‍य प्रदान करण्‍यास सज्‍ज आहे. 

कार खरेदीदारांना मन:शांती प्रदान करण्‍यासाठी रेनॉ इंडिया आपल्‍या नवीन २०२४ श्रेणीमध्‍ये २ वर्षाची प्रमाणित वॉरंटी आणि ७ वर्षांची विस्‍तारित वॉरंटी देत आहे. 


No comments:

Post a Comment

मुंबई व भारतातील कलाकारांचा अनोखा फेस्टिवल “सेलिब्रेशन ऑफ सेरॅमिक्स”दि. २३ व २४ नोव्हेंबर रोजी वांद्रेच्या पाटकर बंगल्याच्या भव्य मैदानामध्ये

मुबई (प्रतिनिधी):  स्टुडिओ पॉटर्स मार्केटच्या वतीने खास कलाप्रेमी व रसिकांसाठी एक अनोखा फेस्टिवल “सेलिब्रेशन ऑफ सेरॅमिक्स” वांद्रे (प) येथील...