Wednesday, January 17, 2024

शापूरजी पालोनजी ग्रुपकडून करो ट्रस्टला मिळाला पाठिंबा, कुर्ल्यात कर्करोग रुग्णांसाठी सुरू केले दुसरे घर


मुंबई ,17 जानेवारी  2024 (AMN):- 
 करो,कर्करोगाच्या रुग्णांसाठी समर्पित असलेल्या अग्रगण्य चॅरिटेबल ट्रस्टने कुर्ला येथे दुसरे आशयना सुरू केले आहे त्यासाठी शापूरजी पालोनजी ग्रुपने करो होम कुर्ला प्रकल्पाला महत्त्वपूर्ण आर्थिक मदत दिली आहे

कमी उत्पन्न असलेल्या पार्श्वभूमीतील किशोरवयीन आणि तरुणरुग्णांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीकॉम्प्लेक्स विनामूल्य निवासप्रदान केलेआहे  त्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मुंबईतील राहण्याचा खर्च कमी होतोवंचित पार्श्वभूमीतील कर्करोग रुग्णांना सर्वांगीण आधार आणि मार्गदर्शन प्रदान करण्याच्या त्यांच्या ध्येयातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ.राजेंद्र बडवे यांनी काल करो होम कुर्लाचे उद्घाटन केलेते म्हणाले, “कर्करोगग्रस्तांना निवासाची व्यवस्था करणे अत्यंत महत्त्वाचे आहेरुग्णांच्या सेवेच्या बाबतीतरुग्णालय 50 टक्के गरजा पूर्ण करते आणि उर्वरित 50 टक्के करो होम सारख्या घरांद्वारे पूर्ण केले जातेजिथे रुग्ण आणि त्यांच्या आरामाची काळजी घेतली जातेयातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांना घरात राहण्याची अनुभूती मिळते

मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी निवासाची गरज लक्षात घेऊन करो ट्रस्टने 2019 मध्ये सायनमध्ये महिला रुग्णांसाठी करो होमने पहिले केंद्र सुरू केले होतेराहण्याच्या सुविधांअभावी कोणालाही रस्त्याच्या कडेला राहावे लागू नये किंवा योग्य उपचाराअभावी राहावे लागू नयेहा त्याचा उद्देश होता.

करोच्या मैनेजिंग ट्रस्टी  उमा मल्होत्रा ​​म्हणतात कि, “करो मध्ये कर्करोगाच्या रुग्णांना संपूर्ण मदत पुरवणे हा आमचा उद्देश आहेत्यांचे आर्थिकवैद्यकीयभावनिक आणि घरांचे प्रश्न सोडवावे लागतीलकुर्ल्यामध्ये करो होम सुरू झाल्यामुळे गरीब घरातून येणाऱ्या किशोरवयीन आणि तरुण कर्करोगग्रस्तांच्या समस्या दूर होण्यास मदत होईलयामुळे त्यांना आवश्यक ती काळजी आणि समर्थन देखील मिळेल.शापूरजी पालोनजी ग्रुपने कुर्ला आणि सायन येथील करो होम्सला आर्थिक सहाय्य देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहेयावरून त्यांची सामाजिक जबाबदारीची बांधिलकी दिसून येते.

2015 पासून, करोने 500 हून अधिक कर्करोग रुग्णांच्या उपचारांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले आहे आणि सायनमधील पहिल्या करो होमद्वारे 300 हून अधिक कुटुंबांना निवासाची व्यवस्था केली आहेकरोने 70 हून अधिक रुग्णालयांमध्ये काम केले आहेतसेचगेल्या 8 वर्षात देशभरातील गरीब कुटुंबातील मुले आणि तरुणांच्या कर्करोगावरील उपचारांसाठी 40 कोटींहून अधिक निधी उभारण्यात आला आहे. Ends


No comments:

Post a Comment

गोवा पर्यटन २४ जून २०२५ रोजी भव्य शिवोली बोट महोत्सवात सांजाव करणार साजरा

शिवोली, १८ जून २०२५ (ए.एम.एन)   –   गोवा सरकारच्या पर्यटन खात्याला, शिवोली सांजाव पारंपारिक बोट महोत्सव आणि सांस्कृतिक संघटनेच्या सहकार्याने...