Friday, June 13, 2025

अपोलो नवी मुंबईत सुरु होणार (ICOM) 'इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल ओबेसिटी अँड मेटाबोलिजम' लठ्ठपणा अनेक आजाराचे मूळ - डॉ संजय खरे


मुंबई, १३ जून २०२५ 
 (एएम नेटवर्क) : स्थूलपणा हे अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. हृदयाचे आजार, मधुमेह आणि काही प्रकारचे कॅन्सर स्थूलपणामुळे होतात. अनेक गंभीर गुंतागुंतीच्या समस्या शरीरात निर्माण होतात. त्यामुळे स्थूलपणावर उपाय करणे हे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नव्हे तर प्राणघातक आजारांना आळा घालण्यासाठी  महत्त्वाचे आहे. अशी माहिती डॉ संजय खरे यांनी जागतिक लठ्ठपणा दिनाच्या पार्श्वभूमीवर दिली.  

मुलांमध्ये स्थूलपणा वाढत आहे, ही अजूनच चिंताजनक बाब आहे. भारतामध्ये ५ ते १९ वर्षे वयाची जवळपास १२.५ मिलियन मुले २०२२ मध्ये स्थूलपणाने ग्रस्तस्त होती. ही आकडेवारी जगात सर्वात जास्त आहे आणि १९९० पासून यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. स्थूलपणा भारतातील शहरी आणि निम-शहरी भागांमध्ये वाढत असलेली एक साथ आहे असे अपोलो हॉस्पिटल्सचे अरुणेश पुनेथा यांनी सांगितले.

आहार तज्ञ, मनोवैज्ञानिक, फिजिओथेरपिस्ट आणि वेलनेस विशेषज्ञ यांनी सुसज्ज असणारे अपोलोचे क्लिनिक वजन कमी करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, साखर मिसळलेली कोल्ड्रिंक्स यांचा वाढता खप, मोबाईल टीव्ही स्क्रीनवर खूप जास्त वेळ घालवणे आणि शारीरिक हालचाली खूपच कमी करणे ही या समस्येची प्रमुख कारणे आहेत असे

No comments:

Post a Comment

BOA Gallery Presents ‘Convergence’ – The Contemporary Art Show

MUMBAI, 02 SEPTEMBER, 2026 | ADARSH MAHARASHTRA: BOA Gallery presents “Convergence – The Contemporary Art Show”, a celebration of diverse ar...