मुंबई (वार्ताहर): प्रसिध्द चित्रकार पूनम राठी यांचे चित्र प्रदर्शन नेस्को ग्राउंड, गोरेगाव येथे सुरू असून त्याला कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेले दोन दिवस सुरू असलेल्या सदर चित्रप्रदर्शनास बॉलीवुड अभिनेते विंदू दारासिंग, प्रसिद्ध चित्रपट नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव, प्रसिद्ध चित्रकार सदाशिव सावंत यांच्यासहित कलाक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. हे प्रदर्शन २७ ऑक्टोबरपर्यंत कलारसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे.
कलाकार हा मनस्वी असतो. याचं मनस्वी वृत्तीतून कलाकाराच्या ब्रश व पेन्सिल मधून त्यांची भावना कॅनव्हासवर व्यक्त होतं असते. लहानपणापासून पूनम यांना चित्रकलेचा ध्यास होता. ती आवडत पूनम यांनी किशोरवयात सुद्धा मनापासून जपली. लग्नानंतर पण वडिलांनी जशी कलेची आवड ओळखून साथ दिली तशीच साथ नवऱ्यानेही चित्रांच्या जगात पुन्हा जगण्यासाठी दिली. जसा मुर्तीकार आपल्या हाताने मुर्तीला देवाचे रुप देतो त्याप्रमाणे पूनम देखील आपल्या स्केचिंगच्या जादूने देवाचे रुप कॅनव्हासवर उतरवतात. पूनम यांनी काढलेल्या गणपती, विठ्ठलच्या स्केचिंगकडे पाहिल्यावर हुबेहुब साक्षात देवाचे दर्शन घडल्यासारखे वाटते. एवढेच नव्हे पूनम यांनी साकारलेल्या ऍक्रॅलिक किंवा पाण्याच्या रंगातील पेटिंग्सचेही कौतूक करण्यासारखे आहे.
चित्रकलेबरोबरच पूनम राठींनी जपलेली आणखीन एक आवड म्हणजे कवितांचे लेखन, पुनम राठी यांच्या विविध विषयावरील कविता वाचल्यानंतर त्यांना सामाजिक भानाची असलेली जाण आणि त्याची जाणीव लक्षात येते. कौटुंबिक स्थिरस्थावर झाल्यानंतर पुनम यांनी आपली चित्रकला पुन्हा जोपासली. प्रसिद्ध चित्रकार सदाशिव सावंत यांच्याकडे चित्रकलेतले बारकावे शिकल्यानंतर पुनम राठींच्या हातून अनेक चित्र निर्माण झाली. आपल्या पत्नीच्या कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या नंदकिशोर राठी यांनी पुनम राठी यांच्या चित्रकलांचा सहभाग कला प्रदर्शनात असावा म्हणून सर्व नियोजन योग्य प्रकारे केलं. सुमारे दोन महिने या प्रदर्शनावर काम चालू होतं. पण अचानक नंदकिशोर आणि पूनम राठी यांची कन्या रिनल हिला प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रदर्शनाआधी पाच दिवस अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. परंतु पूनम राठी खचल्या नाहीत. त्यांना खरा आधार दिला नंदकिशोर राठी यांनी. दिवसभर मुलीची सुश्रुषा, चित्र प्रदर्शनाची तयारी अशा दोलायमान परिस्थितीत पुनम राठी यांनी जिद्द न सोडता चित्र प्रदर्शनात भाग घेण्याचे नक्की केलं होतं. 25, 26, 27 ऑक्टोबर 2024 या कालावधीत नेस्को ग्राउंड गोरेगाव येथे आयोजित असलेल्या चित्र प्रदर्शनामध्ये पुनम राठी यांनी आपल्या चित्रांचा प्रदर्शन मांडलं. शो मस्ट गो ऑन असं कलेच्या क्षेत्रात म्हटलं जातं, ते पूनम राठी यांनी खरं करून दाखवलं. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी पूनम राठी यांची चित्र विकली गेली. पुनम व नंदकिशोर राठी यांच्यामध्ये असलेली समाजकार्याची भावना त्यांना इथेही गप्प बसू देत नव्हती. पहिल्या दिवशी विकल्या गेलेल्या 2 चित्रांच्या मानधनाचा विनियोग म्हणून ही रक्कम मुंबईतील गतिमंद मुलांच्या संस्थेस लवकरच हस्तांतरित करण्यात येईल. मुंबईत लवकरच एक स्वतंत्ररीत्या स्वतःच्या चित्रांचे आणखीन एक प्रदर्शन भरविण्याचा चित्रकार पूनम राठी यांचा निर्धार आहे.