Monday, September 29, 2025

एनयूसीएफडीसी आणि सीएससी एसपीव्ही यांच्यात नागरी सहकारी बँकांच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी सामंजस्य करार


मुंबई, 28 सप्टेंबर 2025 (AMN):
भारतातील नागरी सहकारी बँकांची (UCBs) शिखर संस्था असलेल्या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनयूसीएफडीसी) या क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (सीएसी एसपीव्ही) यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे.

नागरी सहकारी बँकांना सुरक्षित आणि नियमांचे पालन करणाऱ्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरने सक्षम करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आधार-आधारित ई-केवायसी, ई-साइन, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट्स, डिजिलॉकर इंटिग्रेशन, ई-स्टॅम्प सेवा, क्लाउड होस्टिंग, डेटा सेंटर व्यवस्थापन आणि सायबरसुरक्षा उपाययोजना यांचा समावेश असेल. पुढील टप्प्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग, किऑस्क-आधारित सेवा आणि डिजिटल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म्स सुरू करण्यात येतील.

एनयूसीएफडीसी आपल्या सदस्य यूसीबींमध्ये या उपक्रमाचा स्वीकार सुलभ करेल, तर सीएससी एसपीव्ही प्लॅटफॉर्म्स, एपीआय आणि ऑपरेशनल सपोर्ट उपलब्ध करून देईल. अंमलबजावणी आणि क्षमता विकासावर देखरेख करण्यासाठी संयुक्त गव्हर्नन्स टीम काम करेल. करारामध्ये प्रशिक्षण, अनुपालन सहाय्य, तक्रार निवारण आणि डेटा संरक्षण उपाययोजनांचाही समावेश आहे. यूसीबींमधील संस्थात्मक प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी लागू असलेल्या नियामक नियमांशी सुसंगतता साधण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

हा सामंजस्य करार मुंबईत एनयूसीएफडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रभात चतुर्वेदी आणि सीएससी एसपीव्हीचे ग्रुप प्रेसिडेंट श्री. भगवान पाटील यांच्या उपस्थितीत औपचारिकरित्या करण्यात आला.

या भागीदारीबद्दल एनयूसीएफडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रभात चतुर्वेदी म्हणाले, “नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राने आपल्या पारंपरिक पायाभूत स्वरूपासोबत आता डिजिटल युगात झेप घेणे आवश्यक आहे. ही भागीदारी यूसीबींना भविष्यातील गरजांसाठी सज्ज असे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देते, ज्यामुळे त्या लाखो ग्राहकांना अधिक कार्यक्षमतेने, पारदर्शकतेने आणि नियमांचे पालन करून सेवा देऊ शकतील. आर्थिक समावेशन आणि विश्वास हे क्षेत्राच्या विकासाचे केंद्रबिंदू ठरत असताना ही भागीदारी यूसीबींना आधुनिकीकरण आणि आव्हानसक्षमतेच्या मार्गावर ठामपणे उभे करते.”

सीएससी एसपीव्हीचे ग्रुप प्रेसिडेंट श्री भगवान पाटील म्हणाले, “सीएससी एसपीव्हीची डिजिटल पायाभूत रचना आणि एनयूसीएफडीसीचा संस्थात्मक अधिकार एकत्र येऊन नागरी सहकारी बँकांच्या परिवर्तनासाठी एक बळकट तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म तयार करतात. आम्ही एकत्रितपणे अशा उपाययोजना देऊ ज्या व्यापक प्रमाणावर लागू करता येतील. या उपाययोजनांमुळे सहकारी बँकिंग क्षेत्र मजबूत होईल आणि लास्ट-माइल सिटिझन्ससना बँकिंग सेवांचा तितक्याच सोयीस्करपणे अनुभवता येतील. हा उपक्रम म्हणजे डिजिटल भारतासाठी शहरी सहकारी बँकिंगचे नव्याने कल्पनाचित्र रेखाटणे आहे.”

No comments:

Post a Comment

भारतात धोरणात्मक विस्तारीकरण करत स्कॅन ग्लोबल लॉजिस्टिक्सने जागतिक अस्तित्व केले बळकट

मुंबई, 29 सप्टेंबर 2025 (AMN):   जागतिक पातळीवरील लॉजिस्टिक्स कौशल्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या स्कॅन ग्लोबल लॉजिस्टिक्सतर्फे (एसजीएल) भारतात प...