Wednesday, September 17, 2025

जिनकुशल इंडस्ट्रीजची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) 25 सप्टेंबर रोजी खुली होणार, प्रति शेअर 115 रु. ते 121 रु. किंमतपट्टा निश्चित



मुंबई, (आदर्श महाराष्ट्र न्यूज- सचिन मुरडेश्वर): 
केअरएज रिपोर्ट नुसार 6.9% बाजारपेठेतील वाट्यासह भारतातील सर्वात मोठी नॉन-ओईएम कन्स्ट्रक्शन मशिन्स निर्यातदार कंपनी जिनकुशल इंडस्ट्रीज लिमिटेड (JKIPL) ने मंगळवारी आपल्या आगामी 116-कोटी रु. च्या प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) प्रति शेअर 115 रु. ते 121 रु असा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

या किंमत पट्ट्याच्या उच्च टोकाला कंपनीचे मूल्य सुमारे 464 कोटी रु. इतके ठरते. रायपूरस्थित या कंपनीचा पहिली पब्लिक ऑफरिंग 25 सप्टेंबर रोजी खुली होईल आणि 29 सप्टेंबर रोजी बंद होईल.

या आयपीओ मध्ये 86.35 लाख इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू (फ्रेश इश्यू) आणि 10 रु. दर्शनी मूल्याच्या 9.59 लाख पर्यतच्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा प्रस्ताव (ऑफर फॉर सेल) समाविष्ट आहे.

JKIPL आपल्या फ्रेश इश्यू मधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नापैकी 72.67 कोटी रु. दीर्घकालीन वाढीव खेळत्या भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी वापरणार असून उर्वरित रक्कम सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टासाठी वापरली जाईल.

जिनकुशल इंडस्ट्रीजचे प्रवर्तक श्री. अनिल कुमार जैन, श्री. अभिनव जैन, श्रीमती संध्या जैन, श्रीमती तिथी जैन आणि श्रीमती यशस्वी जैन असून ही कंपनी नवीन/सानुकूलित तसेच वापरलेल्या/पुनर्निर्मित केलेल्या कन्स्ट्रक्शन मशिन्सच्या जागतिक बाजारपेठेत निर्यात व्यापारामध्ये कार्यरत आहे. तसेच भारत सरकारच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) तर्फे थ्री-स्टार एक्स्पोर्ट हाऊस म्हणून मान्यता प्राप्त आहे.

JKIPL कंपनी हायड्रॉलिक एक्स्कॅव्हेटर्स, मोटर ग्रेडर्स, बॅकहो लोडर्स, सॉइल कॉम्पॅक्टर्स, व्हील लोडर्स, बुलडोझर्स, क्रेन्स आणि डांबरी पॅव्हर्स यांसारख्या कन्स्ट्रक्शन मशिन्सच्या निर्यात व्यापारात विशेष कुशल आहे. कंपनीने यूएई, मेक्सिको, नेदरलँड्स, बेल्जियम, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि यूके यांसह 30 हून अधिक देशांमध्ये कन्स्ट्रक्शन मशिन्स निर्यात केली आहेत.

आर्थिक वर्ष 2025 मध्ये JKIPL ने 380 कोटी रु. चे कामकाजातून महसूल उत्पन्न नोंदवले असून यात वार्षिक 59.5% वाढ झाली आहे. आरएचपी नुसार ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड आणि व्हिजन इन्फ्रा इक्विपमेंट सोल्युशन्स लिमिटेड या सूचीबद्ध प्रतिस्पर्धी कंपन्या आहेत.

JKIPL भारतातील छत्तीसगड मधील रायपूर येथे 30,000 चौ. फूट क्षेत्रफळ जागेत स्वतःचे पुनर्निर्माण केंद्र चालवते. पुनर्निर्माण प्रक्रिया म्हणजेच दुरुस्ती व नव्याने सुसज्ज पुनर्बांधणी प्रक्रिया करण्याची प्रक्रिया उद्योगक्षेत्रातील मापदंडाशी सुसंगत राहतील हे सुनिश्चित करत या केंद्रामध्ये हायड्रॉलिक मोबाईल क्रेन्स, हायड्रॉलिक क्रिम्पिंग मशीन्स, प्लाझ्मा कटिंग सिस्टिम्स, एमआयजी वेल्डिंग मशीन्स, लेथ्स अँड टर्निंग मशीन्स, लाईन बोरिंग मशीन्स, सँड ब्लास्टिंग, एअर कंप्रेसर्स, पेंटिंग डिव्हाइसेस इत्यादी आधुनिक यंत्रसामग्री बसवण्यात आलेली आहे. 

जीवायआर कॅपिटल ॲडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या आयपीओसाठीचे एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर (BRLM) आहे.


जिनकुशल इंडस्ट्रीजची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) 25 सप्टेंबर रोजी खुली होणार, प्रति शेअर 115 रु. ते 121 रु. किंमतपट्टा निश्चित

मुंबई, (आदर्श महाराष्ट्र न्यूज- सचिन मुरडेश्वर):  केअरएज रिपोर्ट नुसार 6.9% बाजारपेठेतील वाट्यासह भारतातील सर्वात मोठी नॉन-ओईएम कन्स्ट्रक्शन...