Saturday, December 7, 2024

रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी सुधीर मेहता व अजींक्य डी. वाय. पाटील यांच्यासोबत वर्ल्ड पिकलबॉल लीगची पुणे टीमचा घेतला मालकी हक्क .


वर्ल्ड पिकलबॉल लीग 24 जानेवारी 2025 पासून सुरू होईल.

मुंबई,7 डिसेंबर 2024 (प्रतिनिधी):  वर्ल्ड पिकलबॉल लीगला (WPBL) 'पुणे युनायटेड' या पुण्याच्या स्वतःच्या संघाच्या स्थापनेची घोषणा करताना अत्यंत रोमांचित आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडपे म्हणजे रितेश व जेनेलिया देशमुख, ईकेए मोबिलिटी व पिनॅकल इंडस्ट्रीजचे कॉर्पोरेट लीडर्स सुधीर व सुनंदा मेहता आणि अजींक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ अजींक्य डी. वाय. पाटील व पूजा पाटील या मालकांच्या संयुक्त कन्सॉर्शिअमचे पाठबळ या टीमला लाभले आहे.

भारताचे माजी प्रथम मानांकनप्राप्त टेनिस खेळाडू गौरव नाटेकर व आरती पोनाप्पा नाटेकर यांची नाटेकर स्पोर्ट्स अँड गेमिंग ही संस्था द वर्ल्ड पिकलबॉल लीगचे प्रवर्तक आहे. हे भारतात पिकलबॉलमध्ये क्रांती घडविण्यात आघाडीवर आहेत. उत्कृष्ट स्पर्धा, प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे अनुभव, आणि पिकलबॉलसाठी एक सशक्त आणि उत्साही समुदाय उभारण्यास चालना देण्यासाठी डब्ल्यूपीबीएल वचनबद्ध आहे. जानेवारी 2025 पासून सहा संघांसह लीगचा प्रारंभ होणार आहे. यासोबतच, स्थानिक पातळीवर गुणवंत खेळाडू विकसित करण्यासाठी क्रीडास्पर्धांना प्रायोजकत्व देईल. सोनी कॉर्पोरेशन हे डब्ल्यूपीबीएलचे गुंतवणूकदार आणि भागीदार असून अमेरिकेतील इंटरनॅशनल पिकलबॉल फेडरेशनशी (आयपीएफ) संलग्न असलेल्या ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशनसोबत डब्ल्यूपीबीएल काम करते.

आपला आनंद व्यक्त करताना रितेश देशमुख म्हणाले : "पिकलबॉल जगभरात हा वेगाने वाढत जाणारा क्रीडाप्रकार आहे. सर्व वयोगटांमध्ये त्याची क्रेझ व लोकप्रियता प्रचंड आहे. वर्ल्ड पिकलबॉल लीगचा एक भाग होताना आम्ही अत्यंत रोमांचित आहोत. या लीगमुळे पिकलबॉल भारतात निश्चितच नव्या उंचीवर पोहोचेल. पुणे युनायटेडकडून आमचा प्रयत्न आहे की असा संघ तयार करावा जो खेळाडूंना आपले सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरित करेल. तसेच, जोडपी, कुटुंबे आणि समुदायांना एकत्र आणून या अद्भुत खेळाचा स्वीकार करण्यासाठी आणि अधिक आरोग्यपूर्ण व तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देईल."

जेनेलिया देशमुख म्हणाल्या, "पुणे युनायटेडने मोठी सुरुवात केली आहे. वर्ल्ड पिकलबॉल लीगचा भाग होण्याचा आम्हाला खूप आनंद आहे. पिकलबॉलमध्ये सर्वांना एकत्र आणण्याची, प्रेरणा देण्याची आणि जीवन बदलण्याची ताकद आहे. पुणे युनायटेडमधील आमचे ध्येय अगदी साधे आहे: क्रीडांगणाच्या सीमांपलीकडे पिकलबॉलची आवड निर्माण करणे. आम्ही आमच्या खेळाडूंच्या, कुटुंबांच्या आणि समुदायाच्या जीवनाला समृद्ध करणारी ऐक्यभावना, आरोग्य आणि आनंदाची संस्कृती वाढवण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत."

"पुण्यात जागतिक दर्जाची क्रीडा फ्रँचायझी आणायची होती," असे ईकेए मोबिलिटी आणि पिनॅकल इंडस्ट्रीजचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता म्हणाले. "पुणे हे तरुण आणि उत्साही शहर आहे. या ठिकाणी विविध क्षेत्रातील व्यक्ती, विद्यार्थी, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, आणि तरुण व्यावसायिकांची भरभराट झाली आहे. पिकलबॉल हा आजच्या काळासाठी सुयोग्य खेळ आहे. तो सहज उपलब्ध, आरोग्यदायी आणि आनंददायक आहे. पुणे युनायटेडद्वारे आम्ही केवळ कौशल्य जोपासण्याचेच नव्हे, तर पुण्याला नवकल्पना, तंदुरुस्ती आणि समुदाय एकत्रीकरणासाठी एक केंद्र म्हणून अधोरेखित करणारी संस्कृती निर्माण करण्याचा आमचा दृष्टिकोन आहे."

अजींक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष अजींक्य डी. वाय. पाटील म्हणाले, "पुणे युनायटेडच्या माध्यमातून आम्हाला सर्व वयोगटांतील आणि पार्श्वभूमीतील लोकांना जोडायचे आहे, ज्यामुळे एकी आणि अभिमानाची भावना निर्माण होईल. हा एक रंजक आणि आकर्षक खेळ आहे आणि पुणे युनायटेडचा संघ फक्त शहराच्या अपार क्षमतांचेच नव्हे तर त्याच्या समृद्ध संस्कृतीचे आणि नावीन्यपूर्ण ऊर्जेचे प्रतिनिधित्व करेल."  

वर्ल्ड पिकलबॉल लीगच्या नवीन संघाबद्दल डब्ल्यूपीबीएलचे संस्थापक व सीईओ गौरव नाटेकर म्हणाले, "एक पुणेकर म्हणून मला पुणे युनायटेडला डब्ल्यूपीबीएल कुटुंबात सामील करताना खूप आनंद होत आहे. विविध पार्श्वभूमी असलेल्या आणि क्रीडाप्रेमाने प्रेरित असलेल्या या ऊर्जावान मालकांच्या समूहामुळे नक्कीच एक भक्कम संघ तयार होईल आणि पुण्यात तसेच इतरत्रही पिकलबॉलच्या लोकप्रियतेत आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. पिकलबॉल खेळासाठी योग्य पायाभरणी करण्यासाठी या शहराची समृद्ध क्रीडा आणि सांस्कृतिक परंपरा सुयोग्य आहे." 

पिकलबॉलची जागतिक स्तरावर वाढणाची लोकप्रियता लोकांना एकत्र आणण्याची, तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्याची आणि आनंद देण्याची ताकद दर्शवते. वर्ल्ड पिकलबॉल लीगचा भाग म्हणून पुणे युनायटेड या खेळाला राष्ट्रीय स्तरावर अधिक उंचीवर नेण्यासाठी तयार आहे. या खेळाचा सर्वसमावेशकता, समुदाय बांधणी आणि आरोग्य व कल्याणावर होणारा प्रभाव हे गुण आत्मसात करण्याचा पुणे युनायटेडचा प्रयत्न आहे. वर्ल्ड पिकलबॉल लीग 24 जानेवारी 2025 पासून सुरू होईल.


No comments:

Post a Comment

चित्रकार नंदिनी बजेकल यांचे एकल चित्रप्रदर्शन “द वे माऊंटन्स टॉक” दि. ७ ते १३ जानेवारी, २०२५ दरम्यान नेहरु सेंटर आर्ट गॅलरी मध्ये

मुबई (प्रतिनिधी):  प्रसिद्ध चित्रकार नंदिनी बजेकल यांचे एकल चित्रप्रदर्शन “द वे माऊंटन्स टॉक” या शीर्षकांतर्गत मुंबईत नेहरू सेंटर आर्ट गॅलरी...