मुबई (प्रतिनिधी): स्टुडिओ पॉटर्स मार्केटच्या वतीने खास कलाप्रेमी व रसिकांसाठी एक अनोखा फेस्टिवल “सेलिब्रेशन ऑफ सेरॅमिक्स” वांद्रे (प) येथील टर्नर रोडवर असलेल्या पाटकर बंगल्याच्या विंटेज गार्डनमध्ये भरविण्यात आला आहे. हा फेस्टिवल रसिकांना शनिवार दि. २३ नोव्हेंबर ते रविवार दि. २४ नोव्हेंबर, २०२४ हया दरम्यान रोज सकाळी ११ ते ८ हया वेळेत पाहायला मिळणार आहे. यंदाचे हया फेस्टिवलचे हे दहावे वार्षिक सामुहिक कलाप्रदर्शन असून गेल्या नऊ प्रदर्शनांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता.
“सेलिब्रेशन ऑफ सेरॅमिक्स” हया सामुहिक कलाप्रदर्शनात मुंबई व इतर शहरातील स्टुडिओ पॉटरीजचा (कुंभार) व्यवसाय करणार्याह ३० नामवंत कलाकारांचा समावेश असून त्यांनी आपल्या अनोख्या व वैशिष्ट्यपूर्ण रचनात्मक शैलीत साकारलेली विविधांगी मोहक व लक्षवेधी कलारूपे हया प्रदर्शनात मांडली आहेत.
हया दोन दिवसांच्या फेस्टिवलमध्ये प्रामुख्याने हाताने बनविलेल्या सेरॅमिकच्या विविध कलात्मक वस्तूंचा समावेश आहे. ज्यात अनेक घरगुती वस्तूंसह घर सजावटीसाठी काही खास वस्तु, सेरॅमिक शिल्प, भित्ती चित्र, फुलदाण्या, दागदागिने, आधुनिक प्लेट्स व बाउल्स, कॉफी मग, टी पॉट, टेबल वेयर, मुखवटे अशा पारंपरिक व आधुनिक कलाकृतींचा समावेश आहे. त्याचबरोबर सदर प्रदर्शनात विविध कार्यशाला आयोजित केल्या असून कलारसिकांना ही कला पाहण्याबरोबरच शिकण्याचाही आनंद घेता येईल. माती हया एकाच माध्यमातून कलाकार अनेक कलाकृती निर्माण करू शकतो हयाचा अनुभव हया प्रदर्शनात प्रत्यक्षात घेता येईल. सदर कलाप्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध वस्तु अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध असणार असून रसिकांना त्याचा पुरेपूर लाभ घेता येणार आहे.
No comments:
Post a Comment