मुंबई (वार्ताहर): देशभरातील नामवंत अशा सात चित्रकांरानी सादर केलेल्या त्यांच्या निवडक अशा वैशिष्टयपूर्ण चित्राकृतींचे प्रदर्शन मुंबईत वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत दि. २२ ते २८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत रोज ११ ते ७ या वेळेत पाहायला मिळणार आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन श्रीमती रत्ना सेठ गोयंका (संचालक, आर्ट करीक्युलम डेव्हलपमेंट पोदार इंटरनॅशनल स्कूल) यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी गोपाल परदेशी (प्रसिध्द चित्रकार), सुरज लहेरु (संचालक, जे एस आर्ट गॅलरी), बालाजी उभाले (प्रमुख, जे. के. अकादमी आर्ट अॅन्ड डिझाईन वडाळा), अभिनेत्री लेसली त्रिपाठी, प्रख्यात चित्रकार नयना कनोदिया यांच्यासहित कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सदर प्रदर्शनात रणजित वर्मा (माहुर), राणी प्रसाद (दिल्ली), प्रकाश जाधव (मुंबई), बाळकृष्ण कांबळे (लातूर), राम ओंकार (दिल्ली), मुक्ता गुप्ता (झारखंड), अनामिका (दिल्ली) हया भारतातील विविध राज्यातील सात चित्रकारांचा समावेश असून त्यांच्या चित्राकृतीचा अनोखा आविष्कार रसिकांना पहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन कलारसिकांना २८ ऑक्टोबरपर्यन्त विनामूल्य पाहता येईल.
No comments:
Post a Comment