Friday, June 21, 2024

ईकेए (EKA) मोबिलिटीने मित्‍सुई अँड कं. लि.कडून दुसऱ्या टप्‍प्‍यातील गुंतवणूकीची घोषणा केली


मुंबई, 21 जून, 2024 (आदर्श महाराष्ट्र)-
 ईकेए (पिनॅकल मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स)ने घोषणा केली की, औद्योगिक नाविन्‍यतेप्रती योगदानाचा संपन्‍न इतिहास असलेली जागतिक ट्रेडिंग व गुंतवणूक कंपनी मित्‍सुई अँड कं. लि. (''मित्‍सुई'') ने सुरूवातीला घोषणा केलेल्‍या टप्‍प्‍याटप्‍प्‍याने गुंतवणूक करण्‍याचा भाग म्‍हणून दुसऱ्या टप्‍प्‍यातील गुंतवणूक केली आहे, ज्‍यामुळे झपाट्याने विकसित होत असलेल्‍या इलेक्ट्रिक वेईकल (ईव्‍ही) कंपनीप्रती त्‍यांची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. ही धोरणात्‍मक गुंतवणूक भांडवल खर्च (कॅपेक्‍स) आणि खेळत्‍या भांडवलासाठी वापरण्‍यात येईल, ज्‍यामुळे ईकेए मोबिलिटीच्‍या ईव्‍ही क्षेत्रातील सातत्‍यपूर्ण विस्‍तारीकरण व नाविन्‍यतेला पाठिंबा मिळेल. हा टप्‍पा कंपनीसाठी लक्षवेधक मूल्‍यांकन बेंचमार्क स्‍थापित करतो, ज्‍यामधून ईकेए झपाट्याने करत असलेली वाढ दिसून येते.  

डिसेंबर २०२३ मध्‍ये ईकेए, मित्‍सुई आणि व्‍हीडीएल ग्रुप यांनी धोरणात्‍मक दीर्घकालीन सहयोग केला, ज्यामध्‍ये भारतात आघाडीची जागतिक ओईएम निर्माण करण्‍यासाठी टप्‍प्‍याटप्‍प्‍याने १०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची (जवळपास ८५० कोटी रूपये) संयुक्‍त गुंतवणूक, इक्विटी आणि तंत्रज्ञान सहकार्याचा समावेश होता. हा जागतिक स्‍तरावरील नवीन मोबिलिटी विभागातील सर्वात मोठा व सर्वात महत्त्वपूर्ण सहयोग आहे. या सहयोगांतर्गत ईकेए मोबिलिटीला मित्‍सुईकडून मोठ्या प्रमाणात धोरणात्‍मक गुंतवणूका मिळतील, तसेच आघाडीची डच तंत्रज्ञान व उत्‍पादन कंपनी व्‍हीडीएल ग्रुपकडून तंत्रज्ञान साह्य व इक्विटी सहयोग मिळेल. या सहयोगाचा भाग म्‍हणून व्‍हीडीएल ग्रुपची उपकंपनी आणि युरोपमधील इलेक्ट्रिक बसेस् व कोचेसमधील अग्रगण्‍य कंपनी व्‍हीडीएल बस अँड कोच ईकेए मोबिलिटीला तंत्रज्ञान हस्‍तांतरित करत भारतातील बाजारपेठेसाठी भारतात इलेक्ट्रिक बसेस् उत्‍पादित करण्‍यास साह्य करेल.  

या वर्षाच्‍या सुरूवातीला मित्‍सुईने ईकेएमध्‍ये पहिल्‍या टप्‍प्‍यात गुंतवणूक केली, ज्‍यामुळे कंपनीला देशामध्‍ये इलेक्ट्रिक कमर्शियल वेईकल्‍स, नवीन उत्‍पादन विकासासाठी सर्वात मोठे आरअँडडी केंद्र स्‍थापित करता आले, तसेच कंपनी आपली निर्यात उपस्थिती देखील वाढवत आहे. दुसऱ्या टप्‍प्‍यातील गुंतवणूक ईकेए मोबिलिटीच्‍या उत्‍पादन क्षमतांना साह्य करेल, नवीन उत्‍पादन विकासाला गती देईल, बाजारपेठ पोहोच वाढवेल आणि खेळते भांडवल प्रदान करेल. ही गुंतवणूक दैनंदिन कार्यसंचालने, सप्‍लाय चेन ऑप्टिमायझेशन आणि बाजारपेठ विस्‍तारीकरण उपक्रमांना पाठिंबा देण्‍यासाठी कंपनीचा आर्थिक पाया भक्‍कम करेल. 

''आम्‍हाला या दुसऱ्या टप्‍प्‍यातील गुंतवणूकीच्‍या माध्‍यमातून ईकेए मोबिलिटीसोबत आमचा सहयोग दृढ करण्‍याचा आनंद होत आहे,'' असे मित्‍सुईच्‍या मोबिलिटी बिझनेस युनिट १ चे उप डेप्‍युटी जनरल मॅनेजर श्री. हिरोशी ताकेची म्‍हणाले. ''ईकेए मोबिलिटीने ईव्‍ही क्षेत्रात प्रबळ वाढ व नाविन्‍यता दाखवली आहे आणि आम्‍हाला त्‍यांच्‍या सातत्‍यपूर्ण यशाला पाठिंबा देण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही मित्‍सुईच्‍या जागतिक नेटवर्कचा फायदा घेत ईकेएच्‍या स्‍पर्धात्‍मक उत्‍पादनांच्‍या परदेशी बाजारपेठांमधील निर्यातीला गती देण्‍यास उत्‍सुक आहोत. ही गुंतवणूक मित्‍सुईच्‍या शाश्‍वत व भविष्‍यकालीन उद्योगांवरील धोरणात्‍मक फोकसशी संलग्‍न आहे आणि आम्‍हाला विश्‍वास आहे की ईकेए मोबिलिटी भावी परिवहनासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावेल.'' 

भारतातील पुणे येथे मुख्‍यालय असलेली ईकेए व्‍यावसायिक इलेक्ट्रिक मोबिलिटी क्रांतीमध्‍ये अग्रस्‍थानी आहे, तसेच ७ मीटर, ९ मीटर व १२ मीटर कॅटेगरीजमध्‍ये इलेक्ट्रिक बसेस, इंटरसिटी कोचेसची श्रेणी आणि इलेक्ट्रिक लाइट कमर्शियल वेईकल्‍सची श्रेणी विकसित करत आहे. ईकेए भारत सरकारच्‍या ऑटो पीएलआय धोरणांतर्गत मान्‍यता असलेल्‍या कमर्शियल वेईकल उत्‍पादकांपैकी देखील एक आहे. मित्‍सुईच्‍या नवीन गुंतवणूकीमधून ईकेए मोबिलिटीचा दृष्टिकोन, तंत्रज्ञान व बाजारपेठ क्षमतेमधील तिचा आत्‍मविश्‍वास दिसून येतो.  

ईकेए (पिनॅकल मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स)चे संस्‍थापक डॉ. सुधीर मेहता यांनी मित्‍सुईचे सातत्‍यपूर्ण पाठिंब्यासाठी आभार व्‍यक्‍त केले. ते म्‍हणाले, ''आम्‍ही ईकेए मोबिलिटीमध्‍ये अविरत आत्‍मविश्‍वास दाखवण्‍यासोबत शाश्‍वत गुंतवणूक करण्‍यासाठी मित्‍सुई आणि व्‍हीडीएल ग्रुपचे आभार व्‍यक्‍त करतो. हा सातत्‍यपूर्ण गुंतवणूक पाठिंबा आम्‍हाला आमच्‍या विकासाला गती देण्‍यास, बाजारपेठेत झपाट्याने नाविन्‍यपूर्ण ईव्‍ही सोल्‍यूशन्‍स आणण्‍यास आणि शाश्‍वत व हरित परिवहन इकोसिस्‍टम निर्माण करण्‍याप्रती आमचे मिशन दृढ करण्‍यास सक्षम करेल. आम्‍ही मित्‍सुई आणि व्‍हीडीएलसोबत दीर्घकालीन व यशस्‍वी सहयोगासाठी उत्‍सुक आहोत.'' 

कंपनीचा ऑर्डर बुक १००० हून अधिक इलेक्ट्रिक बसेस् आणि ५००० हून अधिक इलेक्ट्रिक लाइट कमर्शियल वेईकल्‍सपर्यंत वाढला आहे. दिल्ली व बृहन्‍मुंबईमध्‍ये ईकेए बसेसना मिळालेला व्‍यापक प्रतिसाद पाहता पुढील काही महिन्‍यांत इलेक्ट्रिक बस ऑर्डर्समध्‍ये वाढ होण्‍याची शक्‍यता आहे आणि कंपनी त्‍याची पूर्तता करण्‍यासाठी उत्तमरित्‍या स्थित आहे.    

================================================

बँक ऑफ बडोदा’च्या वतीने ब्रँड एंडोर्सर म्हणून उदयोन्मुख भारतीय टेनिस खेळाडू सुमीत नागल याची निवड


भारतीय खेळाडूंना स्वत:च्या क्षमतेचे संपूर्ण दर्शन घडविण्याकरिता लवकर मदत उपलब्ध करून देण्याच्या बँकेच्या नीतीमत्तेचा पुरस्कार

आजच्या तरुणांचा रोलमॉडेल, सुमीतचे बँकेला आगामी पिढ्यासोबत जोडण्यासाठी साह्य

मुंबई, 21 जून, 2024 (आदर्श महाराष्ट्र): भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक, बँक ऑफ बडोदा (बँक)च्या वतीने उदयोन्मुख भारतीय टेनिस खेळाडू सुमीत नागल याला आपला ब्रँड एंडोर्सर म्हणून करारबद्ध केले आहे. जागतिक स्तरावर सर्वोत्तम खेळाडूंशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या उदयोन्मुख प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या बँकेच्या दीर्घकालीन तत्वज्ञानाच्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आले. 

सुमीत नागल या 26 वर्षीय खेळाडूची धोरणात्मक निवड तरुणाई आणि ग्राहकांच्या नवीन पिढीला लक्ष्य करण्यासाठी विशेषतः डिझाइन करण्यात आलेल्या उत्पादन श्रेणीसह करण्यात आली. 

सध्या भारतीय एकेरी टेनिस खेळात सुमीतने कारकिर्दीतील जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकात स्थान मिळविताना 17 जून 2024 रोजी #71 क्रमांक पटकावला. जानेवारी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये ग्रँड स्लॅम पुरुष एकेरी सामन्यात मानांकित खेळाडूला पराभूत करणारा सुमीत हा मागील 35 वर्षांमधला पहिला भारतीय खेळाडू ठरला. 

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि युवा क्रिकेटपटू शेफाली वर्मा यांचा समावेश असलेल्या बँक ऑफ बडोद्याच्या एंडोर्सर यादीत सुमीत सामील झाला आहे.. 

या संघटनेबद्दल भाष्य करताना, बँक ऑफ बडोदा’चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ देबदत्त चंद म्हणाले, "बँक ऑफ बडोदा’ला भारतातील काही सर्वात आशादायक क्रीडा प्रतिभांशी भागीदारी करण्याचा आणि त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पाठिंबा देण्याचा समृद्ध वारसा आहे. बँक ऑफ बडोदा कुटुंबात सुमीत नागलचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. टेनिस हा एक जागतिक, अत्यंत स्पर्धात्मक आणि मागणी असलेला खेळ आहे. यामुळे सुमीतचा प्रवास आणि त्याचे ईप्सित अधिक प्रेरणादायी आणि विलक्षण बनते. बँक ऑफ बडोदा, तसेच सुमीत यांच्यातील सहकार्य भारतात खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बँकेला तरुण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल".

"सुमीतची बांधिलकी, चिकाटी, उत्कटता आणि प्रामाणिकपणा ही काही वैशिष्ट्ये आहेत. जी बँक तत्त्वज्ञानाला परिभाषित करतात; ही मूल्ये बँक ऑफ बडोद्यालाही प्रिय आहेत. 2024 हे वर्ष आधीच सुमीतसाठी एक महत्त्वपूर्ण वर्ष ठरले आहे आणि सुमारे 80,000 हून अधिक बडोदा कर्मचारी सुमीतचा जयजयकार करत आहेत. कारण तो आपली स्वप्ने साध्य करण्यासाठी आणि देशाला अभिमान वाटेल असा प्रयत्न करत आहे", असे चंद म्हणाले. 

सुमीत नागल म्हणाला, "बँक ऑफ बडोदा’शी भागीदारी हा माझा सन्मान आणि विशेषाधिकार आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. बँक ऑफ बडोदा ही एक आघाडीची, विश्वासार्ह भारतीय वित्तीय सेवा संस्था आहे जी लाखो लोकांची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा बळकट करते आणि मी या सहकार्याची आतुरतेने वाट पाहत आहे.” 

दिनांक 16 ऑगस्ट 1997 रोजी जन्मलेल्या सुमीतने वयाच्या 8 व्या वर्षी टेनिस खेळण्यास सुरुवात केली. त्याने 2015 विम्बल्डन मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद जिंकले. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये 3 वर्षांत ग्रँड स्लॅम एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये पोहोचणारा सुमीत हा पहिला भारतीय आहे. युरोपमध्ये 2 एटीपी चॅलेंजर एकेरी विजेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. अलीकडेच, एप्रिल 2024 मध्ये, सुमीत हा मोंटे कार्लो मास्टर्स स्पर्धेच्या मुख्य ड्रॉसाठी पात्र ठरणारा 49 वर्षांनंतरचा पहिला भारतीय खेळाडू ठरला. 64 व्या फेरीत माटेओ अर्नाल्डीला पराभूत करून मातीवर मास्टर्स 1000 सामना जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. 

================================================

फिलिपिन्स का ठरतंय महत्त्वाकांक्षी डॉक्टरांकरिता आगामी काळातील मोठे डेस्टीनेशन:श्री. कॅडविन पिल्लई, ट्रान्सवर्ल्ड एज्युकेअरचे संचालक आणि किंग्स इंटरनॅशनल मेडिकल अकादमीचे अध्यक्ष

मुंबई, 21 जून, 2024 (आदर्श महाराष्ट्र): जागतिक आरोग्य सेवा क्षेत्राला अभूतपूर्व आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. पात्र वैद्यकीय व्यावसायिकांची वाढती मागणी दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, 2030 पर्यंत जगभरात 15 मिलियनहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासू शकते. अमेरिका आणि कॅनडासारख्या पारंपरिक गंतव्यस्थानांमध्ये वैद्यकीय शाळेच्या जागांसाठी स्पर्धा अभूतपूर्व उंची गाठत आहे. सुमारे 10,000 पेक्षा जास्त व्यक्तींसाठी 44.5 आरोग्य व्यावसायिकांची किमान आवश्यकता साध्य करण्यासाठी भारताने सुमारे 2 दशलक्ष अधिक डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांची भर घालण्याची गरज असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. 

संख्या जोडणे ही एक साधी अपेक्षा आहे. परंतु ती साध्य करण्याकरिता शिक्षणासाठी औपचारिक मार्ग असणे आवश्यक आहे. या संदर्भात फिलिपिन्स एक उदयोन्मुख तारा म्हणून उदयास आला आहे. हे आग्नेय आशियाई राष्ट्र स्पर्धात्मक किंमतीत उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या अद्वितीय संयोजनासह जगभरातील महत्वाकांक्षी डॉक्टरांना आकर्षित करत आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत परवडणारे शिक्षण शुल्क लक्षणीयरीत्या कमी असणे, आंतरराष्ट्रीय करियरमध्ये सुरळीत संक्रमण सुनिश्चित करणारा अमेरिकेशी संलग्न अभ्यासक्रम आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त निवासी कार्यक्रमांचे मजबूत जाळ्यासह अनेक घटकांमुळे लोकप्रियतेत वाढ झाली आहे. 

बहरती शिक्षण व्यवस्था 

अमेरिकेच्या वसाहतवादी काळापासूनचा समृद्ध इतिहास लाभलेल्या फिलिपिन्सने वैद्यकीय शिक्षणात प्रचंड प्रतिष्ठा निर्माण केली आहे. फाउंडेशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (FAIMER) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यासारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे फिलिपिन्सच्या वैद्यकीय शाळांना मान्यता देणे हा या व्यवस्थेचा पाया आहे. या मान्यता केवळ शिक्षणाच्या गुणवत्तेची पुष्टी करत नाहीत तर पदवीधरांना जगभरातील वैद्यकीय कारकीर्द करण्यासाठी दरवाजे देखील उघडतात.

शिवाय, फिलिपिन्समध्ये इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम आहे. जो जगभरातील विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा ठरतो. या भाषिक फायद्यापायी विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये अखंड संवाद आणि सहकार्य सुलभ करतो. शिकण्याचा अनुभव समृद्ध करतो. शिवाय, वैद्यकीय प्रशिक्षणावर भर दिल्यामुळे फिलिपिन्समधील वैद्यकीय शिक्षण वेगळे ठरते. वास्तविक जगाच्या आरोग्यसेवेतील त्यांच्या कौशल्यांचा सन्मान करून विद्यार्थी सुरुवातीलाच प्रत्यक्ष अनुभव मिळवतात. हा व्यावहारिक दृष्टीकोन केवळ त्यांची वैद्यकीय क्षमताच वाढवत नाही तर भविष्यातील कारकिर्दीसाठी आत्मविश्वास आणि तयारीची भावना देखील निर्माण करतो. 

परवडणारे आणि मूल्य मिळवून देणारे: 

युक्रेन-रशिया संघर्षानंतर, फिलिपिन्स हे महत्वाकांक्षी डॉक्टरांसाठी परवडणारे दीपस्तंभ म्हणून उदयास आले आहे. खरे तर, 15 वर्षांपासून परदेशात एमबीबीएस. शिकण्यासाठी फिलिपिन्स हे सर्वोच्च स्थान राहिले आहे. जगणे आणि वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करण्याची परवडणारी क्षमता हे एक मजबूत कारण आहे. पारंपरिक अंगाने तुलना करता, फिलिपिन्समधले खर्च अल्प वाटतात. फिलिपिन्समधील वैद्यकीय शाळांसाठीचे सरासरी शिक्षण शुल्क खरे तर विद्यार्थ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या आकर्षक आणि व्यवहार्य आहे. शिष्यवृत्ती आणि त्यानुसार तयार केलेल्या इतर आर्थिक सहाय्य कार्यक्रमांची उपलब्धता देखील विद्यार्थ्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यास मदत करते. 

इच्छुक भारतीय विद्यार्थ्यांसाठी फिलिपिन्सने स्वीकारलेली धोरणे उत्साहवर्धक आहेत. या धोरणात 54 महिन्यांचा वैद्यकीय अभ्यासक्रम आणि एक वर्षाची इंटर्नशिप समाविष्ट होती. पूर्वी, फिलिपिन्सने प्री-मेड प्रोग्रामसह 4 वर्षांचा एमडी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला होता. परंतु आता, विद्यार्थ्यांनी 54 महिन्यांच्या अभ्यासक्रमाचे पालन करणे आवश्यक आहे. फिलिपिन्सचा सीएचईडी (फिलिपिन्सच्या समतुल्य उच्च शिक्षण विभाग) आणि पीआरसी (व्यावसायिक नियामक आयोग) परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यमान वैद्यकीय कायद्यांतर्गत एक वर्ष इंटर्नशिपसह या अभ्यासक्रमाचे पालन करण्याची परवानगी देतात.

प्रवेशद्वार ते वैश्विक संधी 

उत्तर अमेरिकेत प्रॅक्टीस करू इच्छिणाऱ्या डॉक्टरांसाठी, युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसेंसिंग एक्झामिनेशन (यूएसएमएलई) हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. निवासी पदे सुरक्षित करणे आणि शेवटी अमेरिकेत सराव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वैद्यकीय पदवीधरांनी (आयएमजी) या परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणे आवश्यक आहे. युक्रेन, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरसारख्या डेस्टीनेशनच्या तुलनेत, यूएसएमएलईच्या यशातील अपवादात्मक ट्रॅक रेकॉर्डमुळे फिलिपिन्स आयएमजीकरिता एक धोरणात्मक निवड म्हणून उदयास येते.

फिलिपिन्सच्या वैद्यकीय शाळांनी सातत्याने युएसएमएलई उत्तीर्ण होण्याचे प्रमाण गाठले आहे. जे अनेकदा जागतिक सरासरीपेक्षा अधिक मानले जाते. उदाहरणार्थ  अलिकडच्या वर्षांत, चरण 1, चरण 2 सीके (क्लिनिकल नॉलेज) आणि चरण 2 सीएस (क्लिनिकल स्किल्स) परीक्षांचे उत्तीर्ण दर अनेक संस्थांमध्ये 90% पेक्षा जास्त झाले आहेत. अशी उत्कृष्ट कामगिरी विद्यार्थ्यांना कठोर लायसनिंग परिक्षांसाठी तयार करण्यात फिलिपिन्सच्या वैद्यकीय शिक्षणाची परिणामकारकता अधोरेखित करते.

शिवाय, फिलिपिन्सच्या पदवीधरांना अमेरिकेतील निवासी कार्यक्रमांच्या मजबूत जाळ्याचा फायदा होतो. अमेरिका कायमच कौशल्यपूर्ण व्यावसायिकांच्या शोधात असते. अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठित रुग्णालये आणि आरोग्य सेवा संस्थांना फिलिपिन्सच्या वैद्यकीय शाळांमधील पदवीधरांना त्यांच्या निवासी कार्यक्रम स्वीकारण्याचा इतिहास आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेवरील आणि वैद्यकीय प्रशिक्षणावरील विश्वास प्रतिबिंबित होतो. ज्यामुळे जागतिक वैद्यकीय करियरसाठी एक लॉन्चपॅड म्हणून फिलिपिन्सचे स्थान अधिकच बळकट होते.

फिलिपिन्स कशासाठी? 

भारताचा प्रवास जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने होत असताना, विशेषतः वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर, आरोग्यसेवेच्या महत्त्वाला विनाकारण महत्त्व दिले जात आहे असे वाटत नाही. NEET परीक्षेसाठी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यामुळे वैद्यकीय शिक्षणाची मागणी स्पष्ट आहे. तथापि, सुमारे 12 लाखांहून अधिक पात्र विद्यार्थ्यांसाठी 1 लाखांहून अधिक जागा  उपलब्ध असल्याने भारताच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये मोठी तफावत दिसते.

मोठे खर्च आणि भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागांची मर्यादित उपलब्धता यामुळे अनेक इच्छुक परदेशात जातात. जिथे शिक्षण अधिक परवडणारे आहे. विशेषतः परतल्यावर परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा (एफएमजीई) उत्तीर्ण होण्याच्या संदर्भात परदेशातील शिक्षणाचा दर्जा हा चिंतेचा विषय आहे.

भारताच्या अधिक डॉक्टरांची, विशेषतः ग्रामीण भागातील गरज पूर्ण करण्यासाठी, फिलिपिन्स एक आशादायक सहकारी म्हणून उदयास येत आहे. ज्यामुळे आरोग्यसेवा क्षेत्रातील आकांक्षा आणि संधी यांच्यातील दरी भरून निघते. परवडणाऱ्या दरात दर्जेदार शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी फिलिपिन्स एक आकर्षक उपाय देऊ करते. शिवाय, वैद्यकीय अभ्यासक्रमांमधील अलीकडील सुधारणांचा उद्देश परदेशात एमबीबीएससाठी सर्वोच्च डेस्टीनेशन म्हणून देशाचे आकर्षण आणखी वाढवणे हा आहे.

============================================

सुप्रिया लाइफसाइन्सचा उदय: सविस्तर कंपनी प्रोफाईल डॉ सलोनी सतीश वाघ, संचालक, सुप्रिया लाइफसायन्स लि.


मुंबई, 21 जून, 2024 मुलाखत/ (आदर्श महाराष्ट्र):
  डॉ सलोनी सतीश वाघ, संचालक, सुप्रिया लाइफसायन्स लि..

Q. पुढील 5 वर्षांसाठी सुप्रिया लाईफसायन्सचा दृष्टीकोन काय आहे? 

Ans. पुढील पाच वर्षांत आपले उत्पन्न लक्षणीयरित्या वाढवण्याचा आणि आर्थिक वर्ष 27 पर्यंत ते दुप्पट करण्याचा सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेडचा मानस आहे. नवीन उत्पादनांचा समावेश करून, नियंत्रित बाजारपेठांमध्ये प्रवेश करून सीएमओच्या संधींमुळे या विस्ताराला चालना मिळेल. आर्थिक वर्ष 25 मध्ये अल्पावधीत 21-22% विक्री वाढीचा अंदाज असून 28-30% चे चांगले EBITDA मार्जिन राखतो. याव्यतिरिक्त, पुढील दोन ते तीन वर्षांत भांडवली खर्चात 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा आमचा मानस आहे. जे केवळ अंतर्गत स्रोतांमधून आणि कर्जाचा वापर न करता दिले जाईल.

Q. कंपनीच्या गुंतवणूक योजना काय आहेत? 

Ans. सुप्रिया लाइफसायन्सच्या गुंतवणूक योजना पुढील वर्षांमध्ये प्रचंड विकासाची अपेक्षा करतात. उच्च-मार्जिन असलेल्या बाजारपेठांमध्ये विस्तार करून आणि आपल्या उत्पादनांच्या ऑफरमध्ये सुधारणा करून तीन वर्षांत आपली विक्री 1000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, सुप्रिया लाइफसायन्स मुंबईजवळच्या अंबरनाथ येथे एका नवीन सुविधेमध्ये सुमारे 60 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे, जी तयार/फिनिश्ड डोस क्षेत्रातील CMO संधींवर लक्ष केंद्रित करेल. अँटी एन्झायटी, अॅनेस्थेशिया तसेच अँटी डायबेटीस क्षेत्रांना संबोधित करणारी सहा ते सात नवीन संयुगे प्रदान करण्याचा देखील त्यांचा हेतू आहे. 

नवीन मॉलिक्युल पाइपलाइन विकसित करण्यासाठी कंपनीची संशोधन आणि विकासातील (R&D) गुंतवणूक महत्त्वपूर्ण आहे. याव्यतिरिक्त, सुप्रिया लाइफसायन्स वाढीस चालना देण्यासाठी कंत्राटी विकास आणि उत्पादन पर्यायांची तपासणी करत असताना अत्यंत नियंत्रित बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची योजना आखत आहे. सुप्रिया लाइफसायन्स, जे निर्यातीतून 80% पेक्षा जास्त उत्पन्न मिळवते, चीन, दक्षिण अमेरिका आणि आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील मजबूत स्थानाव्यतिरिक्त उत्तर अमेरिकन बाजारपेठेत विस्तार करण्याचा विचार करीत आहे. विशेष म्हणजे, या व्यवसायाने आपल्या अनेक वस्तू अमेरिका आणि युरोपमध्ये आधीच पोहोचवल्या आहेत.

सुप्रिया लाइफसायन्स पुरवठा साखळीची स्थिरता वाढविणे आणि त्याच्या मुख्य API करिता किंमतीतील अस्थिरता कमी करण्यासाठी बॅकवर्ड इंटिग्रेशन धोरण वापरते.

याव्यतिरिक्त, कंपनीच्या दोन नवीन संशोधन आणि विकास केंद्रांच्या स्थापनेत नावीन्यपूर्णतेबद्दलची बांधिलकी दिसून येतेः एक सध्याच्या लोटे साइटवर प्रॉडक्ट लाईफसायकल मॅनेजमेंटसाठी आणि दुसरे अंबरनाथ येथे नवीन मॉलिक्युल, कंत्राटी विकास आणि विपणनासाठी प्रायोगिक प्रकल्पासह. सुप्रिया लाइफसायन्सने भविष्यातील विकासासाठी रायगड जिल्ह्यातील पेणजवळील इसांबे इंडस्ट्रीयल पार्कमध्ये 80,000 चौरस मीटर जमीन मिळवली आहे. जी त्याची दीर्घकालीन दूरदृष्टी आणि धोरणात्मक नियोजन दर्शवते.  

Q. सुप्रिया लाइफसायन्स कोणत्या नवीन विभागांकडे विशेष लक्ष देत आहे?

Ans. दीर्घकालीन यश सुनिश्चित करण्यासाठी, सुप्रिया लाइफसायन्स उत्पादने वाढवण्यावर आणि त्याचा पोर्टफोलिओ विस्तृत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आमचे एनाल्जेसिक/अॅनेस्थेटिक क्षेत्र चांगली कामगिरी करत असताना, इतर विभागांनी किरकोळ घसरण दर्शविली आहे. जसे की उपचारात्मक कामगिरीतील तिमाही बदलांचे वैशिष्ट्य आहे. तथापि, आपली बहुतांश औषधे वाढीचे नमुने दर्शवित आहेत. आपल्या क्षेत्रांना आणखी बळकट करण्यासाठी आपली धोरणात्मक उद्दिष्टे आहेत. अतिरिक्त औषधे जोडून आम्ही सक्रियपणे आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत आहोत. अँटी एन्झायटी तसेच अँटी डायबेटीस औषधांचा समावेश करण्यासाठी आम्ही आमच्या उत्पादनांचा विस्तार केला आहे. हा विस्तार विविध वैद्यकीय गरजांना पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या बाजारपेठेचा विस्तार करण्यासाठीचे आमचे समर्पण दर्शवितो. अशा प्रकारे, बाजारपेठेच्या मागण्यांचे सातत्याने मूल्यांकन करून आणि आमच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये नाविन्य आणत, आम्ही सर्व विभागांची कामगिरी वाढवण्याचे, आमच्या भागधारकांसाठी शाश्वत वाढ आणि मूल्य सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.  

Q. पोर्टफोलिओच्या विस्तारासाठी कंपनीची काही योजना आहे का? 

Ans. काही विशिष्ट वस्तू आणि वापरकर्त्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आम्ही सक्रियपणे आमच्या उत्पादनांची व्याप्ती वाढवत आहोत आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करत आहोत. आम्ही नवीन वस्तू आणि उपचार सुरू करून आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत आहोत. याव्यतिरिक्त, आम्ही संपूर्ण उत्तर आणि लॅटिन अमेरिकेत नियामक मंजुरी मिळविण्यासाठी काम करत आहोत. कोणतीही चिंता न करता आमची अलीकडील ANVISA लेखापरीक्षण मंजुरी या उपक्रमांवरील आमचा विश्वास दृढ करते. आम्ही Module E वर 60 ते 70 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. ज्यामुळे लवकरच आमची उत्पादन क्षमता 900 KL पर्यंत चौपट होईल. ही वाढ आम्हाला केवळ आमच्या नवीन वस्तूंसाठीच मदत करत नाही, तर यामुळे सहकार्याच्या संधीही निर्माण होतात. याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या अंबरनाथ साइटवर नवीन संवेदनाशामक उत्पादनासाठी बॉटलिंग लाइन स्थापित करण्यासाठी आणखी जवळपास 60 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहोत. या उत्पादनाच्या जागतिक बाजारपेठेचे मूल्य 300 दशलक्ष डॉलर्स असल्याने, या विस्तारामध्ये आम्हाला वाढीची आशादायक क्षमता दिसते. 

Q. रासायनिक कंपन्या औषधनिर्मिती क्षेत्रात का प्रवेश करत आहेत? 

Ans. अनेक ठोस बाबी रासायनिक कंपन्यांना भारताच्या औषधनिर्माण व्यवसायात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहेत. उदाहरणार्थ, भारतीय रासायनिक क्षेत्रातील अभूतपूर्व वाढ व्यापक बाजार निर्देशांकांपेक्षा चांगली कामगिरी करते आणि ती सुरूच राहील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे गुंतवणुकीचे एक आकर्षक वातावरण निर्माण होईल. दुसरे म्हणजे, देशांतर्गत मागणीतील वाढ आणि जागतिक रासायनिक वापरामध्ये भारताच्या अपेक्षित योगदानामुळे बाजारपेठेतील फायदेशीर क्षमता निर्माण होते. तिसरे, पर्यावरणपूरक उत्पादनांसाठी जगभरातील ग्राहकांच्या वाढत्या मागणीचा भारताला फायदा होऊ शकतो, कारण त्याची लक्षणीय रासायनिक उत्पादन क्षमता आहे. 

याव्यतिरिक्त, बदलते जिओ-पॉलिटिक्स आणि लवचिक पुरवठा साखळीची आवश्यकता लक्षात घेता, कंपन्या उत्पादन क्षेत्रात विविधता आणण्याचा विचार करीत आहेत, ज्यामुळे भारताच्या आकर्षणात भर पडते. लोकसंख्या वाढ आणि आर्थिक समृद्धीमुळे चालणाऱ्या भारतातील वाढत्या औषधनिर्माण उद्योगात, विशेषतः दीर्घकालीन परिस्थितीवर उपचार करणाऱ्या औषधनिर्माण क्षेत्रासाठी, लक्षणीय वाढीची क्षमता आहे. भारताची सिद्ध उत्पादन क्षमता, विशेषतः जेनेरिक आणि लसींमध्ये, त्याला जागतिक औषधनिर्माण उद्योगातील प्रमुख सहभागी म्हणून स्थान देते. शिवाय, बौद्धिक संपदा अधिकार (IPR) वातावरणातील प्रगतीमुळे जागतिक औषधनिर्मात्यांना भारतीय बाजारपेठेचे आकर्षण वाढते. ही एकत्रित वैशिष्ट्ये भारताला केवळ औषधांच्या विस्तारासाठी एक आकर्षक बाजारपेठ बनवत नाहीत, तर रासायनिक व्यवसायांना त्यांच्या कामकाजात यशस्वीरित्या विविधता आणण्याची बरीच संधी देखील देतात.

 

Thursday, June 13, 2024

बँक ऑफ बडोदाने केली #SaluteHerShakti स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा


बँकेच्या ब्रँड एंडोर्सर्स पी व्ही सिंधू आणि शेफाली वर्मा यांनी केला 
3 विजेत्यांचा सन्मान

 

मुंबई, 13 जून2024 (AMN):  सार्वजनिक क्षेत्रामधल्या आघाडीच्या बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने (बँक) #SaluteHerShakti स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीच्या विजेत्यांची घोषणा केली. स्पर्धेचा शुभारंभ दर वर्षी मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनाला होतो. ही स्पर्धा आपल्यातल्या सर्वसामान्य दिसणाऱ्यातरीदेखील स्वत:च्या क्षेत्रात सर्व अडथळे पार करतसमाजाच्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाणाऱ्या स्त्रियांना ओळखून त्यांचा सन्मान करते. या स्त्रियांच्या गाथा चिकाटीधैर्य आणि उत्तुंग उत्साहाने भरलेल्या असतातत्यांच्यापासून सर्वांना प्रेरणा मिळते. दिनांक 08.03.2024 ते 20.03.2024 या स्पर्धेच्या कालावधीमध्ये बॅंकेला तिच्या सोशल मीडिया हँडल्सवर अनेक एंट्रीज आल्याज्यांच्यामधून सर्विलिंक सिस्टिम्स लि.वडोदराच्या मधु मोतियानीनवी मुंबईतील सनशाइन एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापिका सुश्री परमिता मुझुमदार आणि पुणे येथील हेलिआ ग्लोबल स्कुलच्या एज्युप्रेन्योर अनुष सलामपुरिया या तिघी विजेत्या ठरल्या.

 

या तीन विजेत्यांना भारताच्या क्रीडा जगतातील मान्यवर खेळाडू आणि बँकेच्या एंडोर्सर्स पी व्ही सिंधू आणि शेफाली वर्मा यांच्यासोबत संवाद साधण्याची विशेष संधी मिळाली.   

 

चौथ्या वर्षी बँक ऑफ बडोदाची #SaluteHerShakti स्पर्धा पुरुष आणि स्त्रियांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देते. स्पर्धेतल्या प्रवेशासाठी स्पर्धकांना त्यांच्या जीवनातप्रयत्नांमध्ये तसेच यशामध्ये त्यांच्यासाठी प्रेरणा स्त्रोत ठरलेल्या  आणि त्यांच्या जीवनावर प्रभावी ठसा उमटवणाऱ्या सर्वसामान्य स्त्रीचा किस्सा सादर करावा लागतो.  

 

बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक श्री लाल सिंग म्हणाले, “बँक ऑफ बडोदाची #SaluteHerShakti स्पर्धा सर्वसामान्य भासणाऱ्या स्त्रियांच्या असामान्य गाथा शेअर करण्याचा आणि त्यामधून बरेच काही शिकण्याचा एक मंच आहे. स्पर्धेमध्ये स्त्री सबळीकरणाचा सन्मान करुन आणि रुढींना झुगारुन स्त्रियांच्या यशाची पोचपावती दिली जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो. या सर्व स्त्रिया कौतुकास्पद आहेत. त्यांच्यामुळे अनेकांना आपले स्वप्नअपेक्षा आणि महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलायला प्रेरणा मिळणार आहे.”

Friday, June 7, 2024

आयपीआरएस x स्वरथमा टूर पुण्यात



पुणे, ७ जून २०२४ (आदर्श महाराष्ट्र) - आयपीआरएस (इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटी लिमिटेड), संगीत निर्मात्यांचे हक्क संरक्षित करण्यासाठी आघाडीची संस्था, नुकतीच बंगलोरच्या प्रसिद्ध भारतीय फोक-फ्यूजन बँड स्वरात्मा सोबत बहुप्रतीक्षित टूरसाठी एकत्र आली आहे. ही टूर केवळ अविस्मरणीय संगीत सादर करण्याविषयी नाही तर टिकाऊपणाचा प्रचार करण्याविषयी आहे. पारंपरिक डिझेल जनरेटरच्या ऐवजी पोर्टेबल क्लीन एनर्जी सिस्टीमने त्यांच्या परफॉर्मन्सला शक्ती देण्याचे वचन देऊन, स्वरात्मा पर्यावरणपूरक कॉन्सर्ट्ससाठी एक नवीन मानक स्थापित करत आहे.

ही टूर केवळ सादरीकरणांची मालिका नाही. एका सहकार्याने, इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेड (आयपीआरएस) आणि स्वरात्मा संगीत उद्योगात टिकाऊ पद्धतींचा प्रचार करण्यासाठी भागीदारी करत आहेत. हा पुढाकार आयपीआरएस च्या ‘माय म्युझिक माय राइट्स’ मोहिमेसोबत उत्तम प्रकारे जुळते, ज्याचा उद्देश डिजिटल जगात संगीत निर्मात्यांना सशक्त बनवणे आहे. एकत्रितपणे, आयपीआरएस आणि स्वरात्मा मुख्य संगीत बाजारपेठांमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी आणि निर्मात्यांच्या समुदायाशी सखोलपणे संवाद साधण्यासाठी सज्ज आहेत.

हा कार्यक्रम- शनिवार दिनांक 8 जून 2024 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता, फिनिक्स मार्केटसिटी, विमान नगर, पुणे येथे होणार आहे.

निर्मात्यांसाठी, ही टूर एक अद्वितीय संधी देते. IPRS प्रत्येक शहरात कॉन्सर्ट्सपूर्वी ज्ञान कार्यशाळा आयोजित करणार आहे, ज्यात संगीत हक्क, रॉयल्टीज, आणि टिकाऊ करिअर विकास याविषयी अमूल्य माहिती दिली जाईल. या संवादात्मक सत्रांमुळे निर्मात्यांना IPRS आणि स्वरात्मा टीमशी संवाद साधण्याचे, त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचे आणि संगीत क्षेत्रात यशस्वी करिअर घडवण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळवण्याचे व्यासपीठ उपलब्ध होईल. स्वरात्मा, एक स्थापन झालेला बँड आणि IPRS सदस्य, यांच्या उपस्थितीमुळे या कार्यशाळा निश्चितच मोठी मूल्यवर्धन करतील, ज्यामुळे या कार्यशाळा एक आवर्जून उपस्थित राहण्यायोग्य घटना बनतील.

जिथे शिक्षण मनोरंजनाला भेटते त्या प्रेरणादायी प्रवासाचा भाग व्हा. उद्योगातील तज्ञांकडून शिकण्याची आणि संगीताच्या भविष्यात क्रांतिकारक बदल करणाऱ्या पुढाकाराचा भाग बनण्याची संधी गमावू नका. टूरच्या तारखा आणि कार्यशाळा नोंदणीसाठी अधिक माहितीसाठी [वेबसाइट लिंक] भेट द्या. चला एकत्र निर्माण करूया, शिकूया, आणि टिकाऊ बनवूया!

Wednesday, June 5, 2024

सिल्वर शो 7 से 10 जून को मुंबई के जियो कन्वेंशन सेंटर में आयोजित होगा विशिष्ट द्वितीय "सिल्वर शो ऑफ इंडिया" में 350 टन चांदी और 150,000 से अधिक डिजाइन प्रदर्शित होगी




मुंबई, 5 जून, 2024 आदर्श महाराष्ट्र समाचार (AMN): "सिल्वर शो ऑफ इंडिया" नामक चांदी की विशिष्ट द्वितीय प्रदर्शनी 7 से 10 जून 2024 को मुंबई बीकेसी स्थित जिओ कन्वेंशन सेंटर में आयोजित होगी. 

इंडिया बुलियन एंड ज्वेलर्स एसोसिएशन लि. (इब्जा) के राष्ट्रीय प्रमुख पृथ्वीराज कोठारी ने बताया कि विश्व भर के विख्यात सिल्वर ज्वैलर और डिजाइनर के यहां 800 से अधिक बूथ होंगे. इब्जा के नेशनल वाइस प्रेसिडेंट डॉक्टर चेतन मेहता ने कहा कि यहां नैनाकर्षक सिल्वर आर्टिफैक्ट का विशिष्ट कलेक्शन प्रदर्शित होगा. 

इसमें ऑर्नेटनेट ज्वेलरी, जटिल डिजाइन का होम डेकोर, सुंदर ढंग से जड़ित कटलरी आदि दिखाई देगे. यहां 25,000 रजिस्टर्ड मुलाकातियों के प्रदर्शनी की मुलाकात लेने की धारणा है. इब्जा के नेशनल सेक्रेट्री सुरेंद्र मेहता ने कहा कि यहां समृद्ध सांस्कृतिक विरासत दिखाई देगी. 

इस प्रदर्शनी में 350 टन चांदी प्रदर्शित होगी. यहां कलाकार, कलेक्टर, विवेचन और उत्साही लोग एक ही प्लेटफार्म पर मिल सकेंगे. यहां उद्योग के विशेषज्ञों द्वारा वर्कशॉप और डेमोंस्ट्रेशन आयोजित होगा. वे चांदी की टेक्निक और कीमती धातुओं के इतिहास की जानकारी देंगे.

‘कोण होणार हिटलर?’ या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे मिळाले ‘क्युट’ उत्तर! ‘मु. पो. बोंबीलवाडी’ मध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर

१ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि श्री भरत शितोळे यांची मुं...