Thursday, December 28, 2023

'आयच्या गावात मराठीत बोल'च्या धमाकेदार ट्रेलर लॉन्चला ओमी वैद्यचा धमाल अंदाज |



मुंबई, 28 डिसेंबर 2023 (AMN): 'थ्री इडियट्स' या सिनेमात चतुरची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता ओमी वैद्य मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आईच्या गावात मराठीत बोल' या सिनेमातून तो मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.  नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यामध्ये ओमीचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. 





सुपरहिट ठरलेल्या 'थ्री इडियट्स' सिनेमात चतुर नावाचा पात्र साकारून ओमीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या सिनेमात हिंदीमुळे त्याची फजिती झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. आता 'आईच्या गावात मराठीत बोल' चित्रपटात चतुर मराठी बोलताना दिसणार आहे. या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे. 

https://www.instagram.com/reel/C1Yez3GoG58/?igsh=MTc4MmM1YmI2Ng==



'आईच्या गावात मराठीत बोल' या सिनेमात ओमीबरोबर संस्कृती बालगुडे, अभिषेक देशमुख, ध्रुव दातार, पार्थ भालेराव, किशोरी शहाणे, उदय टिकेकर अशी स्टारकास्ट आहे. १९ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Here

No comments:

Post a Comment

परम पूज्य आचार्य श्री कल्पतरु सुरीश्वरजी महाराज आदि अनेक आचार्य पन्यास, मुनि भगवंतो तथा साध्वीजी भगवंत की निश्रा में "रागो पनिषद" का विमोचन

मुंबई, 13 मार्च, 2025 आदर्श महाराष्ट्र -  परम पूज्य प्रशांत मूर्ति आचार्य गच्छनायकश्री तीर्थभद्र सुरीश्वर जी महाराजा द्वारा संशोधित संपादित ...