मुंबई - १६ नोव्हेंबर २०२३ (AMN): इंडियन बॅंक्स असोसिएशन (IBA) द्वारे आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीसाठी इज रिफॉर्म्स निर्देशांकाच्या अहवालानुसार युनियन बँक ऑफ इंडिया ने दुसरे स्थान मिळवले आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाचे उद्दिष्ट ग्राहकांच्या सोयीसाठी विविध डिजिटल आणि डिजिटल आधारित ऑपरेशन्स सुलभ करणे, डिजिटली सक्षम करणे तसेच ग्राहक सेवेत उत्कृष्टता प्रदान करणे, सर्वसमावेशक घरपोच सेवा प्रदान करणे, क्लाउड तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, स्वयंचलित करणे आणि खर्च कमी करणे तसेच गुणवत्तेतील उत्कृष्टता, लोक विकास आणि मानव संसाधन ऑपरेशन्स वाढविण्यासाठी नवीन ऑपरेटिंग मॉडेलशी संबंधित क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कामगिरी इज ६.० अंतर्गत चार विषयांवर मोजली जाते, ज्यामध्ये युनियन बँक ऑफ इंडियाने "डिजिटल सक्षमतेसह ग्राहक सेवेत उत्कृष्टता प्रदान करणे", लोकांचा विकास करणे आणि एचआर ऑपरेशन्स वाढवणे" या दोन थीम अंतर्गत यशस्वीरित्या प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, आणि “डिजिटल आणि अॅनालिटिक्स संचालित व्यवसाय सुधारणा”, "टेक आणि डेटा सक्षम क्षमता निर्माण करणे” या दोन थीम अंतर्गत दुसरे स्थान मिळाले.
वर्धित प्रवेश आणि सेवा उत्कृष्टता (EASE) हा पीएसबी सुधारणा अजेंडाचा एक भाग म्हणून वित्तीय सेवा विभागाचा (भारत सरकार) एक उपक्रम आहे आणि सध्या त्याच्या सहाव्या पुनरावृत्ती अंतर्गत आहे जो "आधुनिक क्षमतांद्वारे सक्षम ग्राहक-अनुकूल बँकिंग" वर केंद्रित आहे.
No comments:
Post a Comment