Tuesday, October 3, 2023

व्ही-गार्डने 'इनसाइट-जी' या सर्वोत्तम दर्जाच्या बीएलडीसी श्रेणीतील पंख्याचे केले अनावरण


मुंबई
, 03 ऑक्टोबर, 2023 (Adarsh Maharashtra News/ Sachin Murdeshwar): इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहोपयोगी उत्पादन क्षेत्रातील भारतातील प्रमुख अग्रगण्य असणाऱ्या व्ही गार्डने सर्वोत्तम दर्जाच्या बीएलडीसी श्रेणीतील इनसाइट-जी या वेगवान क्षमतेच्या पंख्याचे अनावरण केले.

पंख्याचे उद्योग क्षेत्र अंदाजे 12,000 कोटी एवढे आहे आणि 8-9% च्या CAGR ने वाढत आहे. BLDC विभागाचे मूल्य 1500 कोटी (LY) आहे. जे सीलिंग सेगमेंटमध्ये (छताचा पंखा विभाग) 45% च्या CAGR ने वाढत आहे. पारंपारिक इंडक्शन फॅन्समधून बीएलडीसी विभागात वाढणारे आमूलाग्र बदल देखील आहे. 

 

इनसाइट-जी बीएलडीसी श्रेणीतील पंखे हे सौंदर्यशास्त्र आणि कार्यक्षमतेचे एक उत्तम मिश्रण आहे. हे पंखे आकर्षक आकाराचे अदभूत अशा 12 उठावदार रंगांमध्ये उपलब्ध आहेत, ज्या मध्ये अंतर्भूत आहे आकर्षक वुड फिनिश रंग जे ग्राहकांच्या आवडीनुसार त्यांच्या घराच्या अंतर्गत सजावटीची शोभा वाढवते. शिवाय, याला 5 वर्षांची आश्वासक वॉरंटी आणि पंचतारांकित रेटिंगची साथ आहे. इनसाइट जी हा पंखा 35 वॅट्सची अल्प अशी ऊर्जा वापरतो. ज्यामुळे ग्राहकांना वीज बिलात बचत करता येते, वार्षिक 1518/- पर्यंत बचत होते (वास्तविक बचत ही वापर पद्धती आणि लागू वीज दरांवर अवलंबून असते). रुरकी शहरातील 2.25 लाख चौरस फूट कारखान्यात तयार केलेले व्ही-गार्डच्या गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण समर्पणाचे उदाहरण आहे. इतर उल्लेखनीय वैशिष्ट्यांमध्ये 370 प्रति मिनीट आवर्तन असलेली वेगवान मोटर, सुलभ साफसफाईसाठी प्रभावी धूळ-विकर्षक कोटिंग, हिवाळ्यात रिव्हर्स मोड ऑपरेशन, अत्याधुनिक इंटरफेस आणि टाइमर पर्यायांसह वापरकर्ता-अनुकूल असा रिमोट कंट्रोल यांचा समावेश आहे. फॅन बूस्ट मोड, ब्रीझ मोड, स्लीप मोड, स्टँडर्ड मोड आणि कस्टम मोड यासह ऑपरेशनचे अनेक मोड प्रदान करतो, ज्यामुळे तो खरोखर एकमेवाद्वितीय बनतो.


जिओ सेंटर, मुंबई येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात या सौंदर्याच्या परिमाणाने तयार केलेल्या पंख्याचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी बोलताना व्ही-गार्ड इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक आणि सीओओ श्री.रामचंद्रन.व्ही यांनी टिप्पणी केली, “हा फक्त एक पंखा नाही, तर तो जीवनशैली सुधारणारा आहे, ज्यामध्ये आराम, अभिजातता आणि नाविन्य यांचा समावेश आहे. इनसाइट जी ला आमच्या रुरकी, हरिद्वार येथील अत्याधुनिक कारखान्यातून अतिशय बारकाईने पंखा तयार करण्यात आला आहे. हे भारतीय घरांच्या राहण्याच्या जागेला सुशोभित करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह चमकदार सौंदर्य प्रदान करते. भविष्यात आम्ही स्मार्ट प्रकार सादर करणार आहोत जे पुढील पिढीतील ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करतील.”


नाविन्यपूर्णता आणि हरित पृथ्वी या विचारांशी व्ही गार्डची असणारी बांधिलकी बीएलडीसी विभागातील इनसाइट जी अधोरेखित करते. 


व्ही-गार्ड इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल:

व्ही-गार्ड इंडस्ट्रीज लिमिटेड ही कोची येथील भारतातील आघाडीची ग्राहक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. सार्वजनिकरित्या सूचीबद्ध केलेली संस्था, कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 4126 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आणि 32 शाखांसह आणि 50,000 हून अधिक चॅनल भागीदारांसह देशभरात उपस्थित आहे. व्होल्टेज स्टॅबिलायझर्सचे उत्पादन आणि मार्केटिंग करण्यासाठी श्री. कोचौसेफ चिटिलापिल्ली यांनी 1977 मध्ये स्थापना केली होती, ती आता भारतीय इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पॅनोरामामध्ये गणना करण्यासाठी एक शक्ती बनली आहे. कंपनीने, गेल्या 46 वर्षात, एक मजबूत ब्रँड प्रस्थापित केले आहे आणि व्होल्टेज स्टॅबिलायझर्स, इन्व्हर्टर आणि इन्व्हर्टर बॅटरीज, इलेक्ट्रिक वॉटर हीटर्स, सोलर वॉटर हीटर्स, पंप आणि मोटर्स, घरगुती स्विचगियर्स यासह वायर्स आणि केबल्स, पंखे, मॉड्युलर स्विचेस, एअर कूलर आणि स्वयंपाकघरातील उपकरणे पोर्टफोलिओसह बहु-उत्पादन कंपनीमध्ये आक्रमकपणे विविधता आणली आहे. व्ही गार्ड केवळ अनेक श्रेणींमध्ये भारतातील बाजारपेठेचे नेतृत्व प्रदर्शित करत नाही, तर अनेक ' उद्योगक्षेत्रातील प्रथम ' स्मार्ट उत्पादने इंटेलिजंट आणि स्मार्ट वॉटर हीटर्स, स्मार्ट इनव्हर्टर, एलईडी लाईट्ससह स्मार्ट फॅन्स आणि इतर अनेक नाविन्यपूर्ण आणि सौंदर्यदृष्ट्या उत्कृष्ट विविध उत्पादन श्रेणींमध्ये डिझाइन अशी अनेक 'उद्योगक्षेत्रातील प्रथम' स्मार्ट उत्पादने लॉन्च करून उत्पादन नेतृत्व देखील प्रदर्शित करते. 


***

No comments:

Post a Comment

मुंबई व भारतातील कलाकारांचा अनोखा फेस्टिवल “सेलिब्रेशन ऑफ सेरॅमिक्स”दि. २३ व २४ नोव्हेंबर रोजी वांद्रेच्या पाटकर बंगल्याच्या भव्य मैदानामध्ये

मुबई (प्रतिनिधी):  स्टुडिओ पॉटर्स मार्केटच्या वतीने खास कलाप्रेमी व रसिकांसाठी एक अनोखा फेस्टिवल “सेलिब्रेशन ऑफ सेरॅमिक्स” वांद्रे (प) येथील...